वाळुतस्करांनो बंद करा वाळू तस्करी,नाही तर करावी लागणार तुरूंगाची वारी..

0
37
वाळुतस्करांनो बंद करा वाळू तस्करी,नाही तर करावी लागणार तुरूंगाची वारी..
विशेष प्रतिनिधी/शिवाभाऊ दौंड/छत्रपती संभाजीनगर/पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपट्ट्यातील वाळू चोरी थांबवण्यासाठी पैठण तहसील व महसूल प्रशासन कंबर कसली असून विविध फिरते पथके, गोपनीय पथके, निर्माण करून अवैध उत्खनन व वाळु चोरी रोखण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रामुख्याने कावसान,चनकवाडी,पाटेगाव,दादेगाव,वडवळी, नायगाव, नवगाव-तुळजापुर,उचेगाव,टाकळीअंबड,व हिरडपुरी या गावात प्रमुखांनी अवैध वाळु उपसाकरून वाळू चोरी केली जाते.वाळु तस्करी करणारे हे स्थानिकचे असल्याने ते महसूल पथकाची महीती (लोकेशन) अनेक मोटार सायकल व चारचाकी वाहनाने हेरगिरी करून घेत हे अवैध वाळु उपसा करत आहे. कर्तबगार उप विभागीय अधिकारी श्रीमती नीलम बाफना महसूल पैठण-फुलंब्री,नवनियुक्त मा.तहसीलदार दिनेश झांपले यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाळुचोरी थांबवण्यासाठी नवीन प्रयोग म्हणून तालुक्यातील कर्तव्यदक्ष महीला मंडळ अधिकारी व तलाठी, यांची विविध प्रकारच्या पथकांच्या माध्यमातून नेमणुक केली आहे.व ही महीला पथके अतिशय दक्ष पध्दतीने प्रमाणिक पणे आपले कार्य पार पाडत असुन त्यांनी गेल्या तीन ते चार दिवसांत लाखोंचे महसुल चोरी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या (यारी मशीन) केण्याचे साहित्य सामग्री अनेक ठिकाणी अचानक धाड टाकून नष्ट केले आहे.तर लाखो रूपयांचे दोर,पट्टे,हे कापुन जाळुन नष्ट करत वाळु चोरी थांबवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केले आहे.सदची कारवाई पथक प्रमुख कल्पना शेळके मं.अ.पैठण, वैशाली बेनवाड,मं.अ.लोहगाव,शुभांगी शिंदे,मं.अ.बालानगर,सिमा भोसले मं.अ.ढोरकीन,चित्रा धाडेकर,मं.अ.आपेगाव,वैशाली कांबळे,म.अ.आढुळ.
यांच्या उपस्थितीत ग्रा.म.अ.पाटील,बांगर,महाले,मुजमुले,
जळके ,जायभय,पटरे,पोकळे,निकम,मिटके, केंद्रे, राऊत, लिंगायत,सुरडकर,मेघरे,मुंढे,झिरपे,शेजुळ व इतर यांच्या पथकाने केली.या सततच्या व वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे मात्र आता वाळु तस्करांचे धाबे दणाणले आहे.व त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.व सगळीकडे वाळुमाफीयात महसूल प्रशासन विषयी भिती दिवसांदिवस वाढत चालली आहे.तर वरिष्ठ महसूल अधिकारी कडुन ‘एमपीएडी’
कायदे अंर्तगत या वाळु तस्करांविरूध्द कारवाईचे गोपनीय आदेश देण्यात आले आहे.तर या परिसरातील वाळुचोरी थांबवण्यासाठी पैठण तहसील,व महसूल पथकांच्या मदतीला लवकरच उप विभागीय अधिकारी महसूलचे पथक व जिल्हा गौण खनिज पथके तालुक्यात सक्रिय होणार आहे.तर बीड पॅटर्नप्रमाणे कारवाईचे चित्र पैठण तहसील हद्दीत लवकर पहायला मिळणार आहे.