वाळू उपशाकडे महसूलचे अर्थपूर्ण दुर्लक्ष पूर्णा नदीतून बेसुमार वाळू उपसा सुरू ; वाळू माफियांवर पोलिस व महसूल पथकांची मेहरबानी
बोरगांव/प्रतिनिधी/ सिल्लोड तालुक्यात गेल्या महिन्यापासून पूर्णा नदीतून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र, महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र अर्थपूर्ण संबंधामुळे याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याची चर्चा सुरु आहे बोरगांव बाजार व सावखेडा येथे गेल्या कित्येक महिन्या पासून बेकायदेशीर उत्तखनन केलेल्या वाळूचे मोठं मोठे अनेक साठे आहेत. दोन वर्षापासून वाळू उपशातून लक्षाधीश झालेल्या वाळू माफियांनी , बोरगांव बाजार सावखेडा देवळगाव बाजार आणि परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे या वाळू माफियां विरोधात बोलण्याचे धाडस कोणी करीत नाही सावखेडा मेळा पासून ते बोरगांव सारवानी पर्यंत
