वाकी येथील शिवेश्वर देवस्थानाला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील वाकी येथील शिवेश्वर देवस्थानला राज्य शासनाच्या वतीने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे, अशी माहिती देवस्थानचे उत्तराधिकारी नामदेव महाराज पल्हाळ यांनी दिली. येथे विशेषतः श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला राज्यातून भाविक येतात. या देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने विकासकामांसाठी मोठा निधी प्राप्त होणार आहे. यामध्ये मंदिर क्षेत्रासह रस्ते, भक्त निवास, संरक्षण भिंत, सभामंडप, सुशोभीकरण, विस्तारीकरण आदी विकासकामे मार्गी लागणार आहेत
