Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादशासनाने भाकड जनावरांचे वजन करून वजनाप्रमाणे पैसे द्यावेत-शेतकऱ्यांची मागणी

शासनाने भाकड जनावरांचे वजन करून वजनाप्रमाणे पैसे द्यावेत-शेतकऱ्यांची मागणी

शासनाने भाकड जनावरांचे वजन करून वजनाप्रमाणे पैसे द्यावेत-शेतकऱ्यांची मागणी
कुरेशी बांधवांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका शेतकरी चिंतेत 
केज/प्रतिनिधी/ शासनाने भाकड जनावरांचे वजन करून वजनाप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत अशीमागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. तर कुरेशी बांधवांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून शेतकरी सध्या चिंतेत आहेत,शेतकरी अडचणीत सापडले असून शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा व्यापारी व शेतकरी बांधवांनी साळेगाव येथील आठवडी जनावराच्या बाजारात माध्यमांशी बोलताना प्रशासनाला दिला आहे.
याबाबत माहितची सविस्तर माहिती अशी की, गो हत्येच्या नावाखाली काही बजरंग दलाचे कार्यकर्ते व गोरक्ष गोशाळेच्या नावाखाली व्यापाऱ्यांना नाहक त्रास देऊन व त्यांचा छळ करून पैसे वसूल करत आहेत. संबंधिताविरोधक तक्रार देण्यासाठी व्यापारी व शेतकरी पोलीस यांच्याकडे जातात परंतु पोलीस शेतकऱ्याची व व्यापाऱ्यांची तक्रार दाखल करून घेत नाहीत पोलिसाचे व बजरंग दल आणि गोरक्षकांचे लागेबांधे आहेत असा आरोप व्यापारी व शेतकऱ्यांनी केला आहे.
सध्या संबंध राज्यावर कुरेशी समाज बांधवांच्या वतीने जनावरे खरेदी विक्री सह इतर व्यवसाय बंद करून संप पुकारला आहे.
या संपाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे सध्या शेतकरी अडचणीत सापडला असून गुरुवारी केज तालुक्यातील साळेगाव येथील आठवडी जनावरांचा बाजार ठप्प झाला आहे. दुपारी २-०० वाजेपर्यंत फक्त तीन व्यवहार झाले होते जनावराचे खरेदी विक्री नंतर जनावराचे दाखले केले जातात त्यावरून सदर नोंद झाल्याची माहिती मिळाली.
 माध्यमांशी बोलताना शेतकरी बांधव म्हणाले की, आमची वय वृद्ध जनावरे, लंगडी मोडलेले व अपंग जनावरे आणि भाकड जनावरे सध्या आमच्याकडे चारा शिल्लक नसल्यामुळे आम्ही जनावरे सांभाळू शकत नाहीत. जर व्यापाऱ्यांनी आमची जनावरे खरेदी केली नाही तर आम्ही जनावरे कुठे घेऊन जायची सध्या आम्हाला शेतात खत, औषधे, खुरपणी करण्यासाठी पैसे नाहीत आमच्याकडील भाकड जनावरे व्यापाऱ्यांना विकून आम्ही आमच्या अडचणी भागवत होतोत. परंतु व्यापाऱ्याने बंद पुकारल्यामुळे आज आमचे व्यवहार बंद झाले आहेत शासनाने तात्काळ कायदा शितील करून पूर्वीप्रमाणे जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार चालू करावेत अन्यथा शासनांनी आमच्या जनावरांची वजनाप्रमाणे खरेदी करून आम्हाला पैसे देऊन आमची जनावरे गो शाळेत द्यावी. आज आम्ही साळेगाव येथील बाजारात जनावरे विक्रीसाठी घेऊन आलो परंतु व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे आमचा आज रोजी चा जाणे येण्याचा खर्च देखील निघत नाही. व्यापाऱ्यांच्या संपामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी दिल्या आहेत.
गावरान गाई ही गोमाता आहे आम्ही गावरान गाईची खरेदी विक्री करत नाहीत व गावरान गाईची कत्तल करत नाहीत परंतु जरशा गाईंचे आम्ही खरेदी विक्री करत आहोत गोरक्षणाच्या नावाखाली नाहक आमची बदनामी करून स्वतःच्या फायद्यासाठी आम्ही खरेदी केलेले जनावरे आढळून आमच्याकडून पैसे वसूल करत आहेत. आम्ही बाजारात शेतकऱ्याकडून बैल, म्हशी, दूध देणाऱ्या जरश्या गाईंची खरेदी विक्री करत आहोत. बाजारातून जनावरे खरेदी विक्री करून आमच्या गावाकडे जात असताना वाटेत बजरंग दलाचे काही कार्यकर्ते व गोरक्षणाच्या नावाखाली काही लुटारू हे आमच्या जनावरांनी भरलेल्या गाड्या अडून आम्हाला दमदाटी करून आमच्याकडून पैसे वसूल करतात जर आम्ही नाही पैसे दिले तर आम्हाला धमक्या देतात. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे आमचा व्यापार बंद पडला असून आमच्यावर व आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. वरील लोकांच्या त्रासामुळे आम्ही जनावरांची खरेदी विक्री सह इतर सर्व व्यवहार बंद केले आहेत जोपर्यंत शासन आमची दखल घेत नाहीत तोपर्यंत आम्ही संप चालू ठेवणार आहोत अशा प्रतिक्रिया व्यापारी बांधवांनी दिले आहेत. जर प्रशासनाने आमच्या मागणीची दखल न घेतल्यास यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments