Saturday, October 25, 2025
Homeऔरंगाबादवाचनाने व्यक्तिच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते-ईश्वर वाघ

वाचनाने व्यक्तिच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते-ईश्वर वाघ

वाचनाने व्यक्तिच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते-ईश्वर वाघ

व्यक्तिने सतत वाचन करत रहावे कारण वाचनातून अनेक वाक्य मिळतात त्या वाक्यातून आयुष्याला योग्य दिशा मिळून सृजनशिलता वाढते असे प्रतिपादन ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय, श्रीराम संस्कृत विद्यालय, अखिल भारतीय शालिवाहन संस्कृत प्रतिष्ठान, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन व शालेय संस्कृत स्पर्धा-२०२५ पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी संस्कार प्रबोधिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर वाघ यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण मानधना, सत्कारमुर्ती विवेक कुलकर्णी, अखिल भारतीय शालिवाहन संस्कृत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर भालेराव, ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष कैलास बियाणी, जिल्हा परीषद प्रशाला नेरचे शिक्षक संदीप नेरकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शाम शेलगांवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व वाचन संकल्प आणि वाचन प्रेरणा दिनाचे घोषवाक्य सर्वांकडून म्हणून घेतले

ईश्वर वाघ मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, वाचनाने मिळणाऱ्या माहितीमुळे उत्साह वाढतो. आयुष्यामध्ये चांगले मित्र, पुस्तके कायम स्वरुपी जपा कारण आपल्या अडचणीच्या काळात हेच आपल्याला बाहेर काढतात. ज्ञानशील माणूस जगण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. आपल्याकडे वाचनासाठी जे जे मिळेल त्यातून वाचनाची सवय लावाली. मोबाईलचा वापर कमी करुन वाचन वाढवावे. संस्कृत स्पर्धेतून विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित होतात. लहानपणी केलेले पाठांतर हे कायम स्वरुपी लक्षात रहाते. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. इतर भाषापेक्षा उच्चार स्पष्ट करणारी संस्कृत भाषा आहे.

विवेक कुलकर्णी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. स्पर्धेच्या युगात टिकाव ठेवण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. कधी-कधी सोशल मिडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे खरे असते. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती असतांना देखिल सतत वाचन करायचे. विद्यार्थ्यांनी दहावी नंतर संस्कृत भाषेचे शिक्षण घ्यावे संस्कृत भाषेची आवड जपणे ही काळाची गरज आहे. संस्कृत भाषा पाठांतरापुरती मर्यादीत न रहाता त्यामध्ये भारतीय ज्ञान व परंपराचा समावेश असल्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये संस्कृत भाषेचा समावेश करण्यात आला आहे. संस्कृत भाषेमध्ये असलेल्या स्तोत्र, मंत्रामुळे आपण ध्यान-धारणाकरुन मनाला शांती मिळते. आयुष्यामध्ये आपण कायम वेळेचा आदर करणे आवश्यक आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अंगी असणाऱ्या गुणांचा विद्याथ्यांनी अंगीकार करावा असे मार्गदर्शन लक्ष्मीनारायण मानधना यांनी केले.

महाराष्ट्र शासना तर्फे शिक्षण विभागातील शिक्षकांसाठी देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार-२०२४-२०२५ विवेक कुलकर्णी यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्कृत स्पर्धेमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी च्या प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ ३३ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments