Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज शहरातील दत्ताजी भाले रक्तपेढी जवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी नवीन इमारतीच्या कामाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

यावेळी श्री. पवार म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथे सारथी संस्थेचे सुरू असलेले काम दर्जेदार झाले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा यंत्रणा व संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करा, असे सांगतानाच त्यांनी कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी कार्यकारी अभियंता श्रीमती पुजारी यांनी यांनी सारथी संस्थेच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सारथी संस्थेचे प्रभारी उपव्यवस्थापकीय संचालक रामदास दौंड,  छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे, अधीक्षक अभियंता सुंदरलाल भगत, कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता योगिता जोशी यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments