ऊन्हाचा पारा ४२ पार , नागरिकांनी उनहापासुन बचावसाठी वेळोवेळी पाणी प्यावे,
फुलंब्री /प्रतिनिधी /उन्हाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. कडक उन्हामुळे अनेकांना उष्मघाताचा त्रास होताना दिसत आहे. उन्हाळ्यात प्रत्येकानेच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. वातावरणातील उष्णतेमुळे, अशक्तपणा जाणवते किंवा उन्हामुळे शरीर डिहायड्रेट होते. कधी कधी उष्णता विकारांमुळे एखाद्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा परिस्थितीत, आपण घरी काही गोष्टी, उपाययोजना केल्या तर हा त्रास टाळता येऊ शकतो किंवा त्याची तीव्रता कमी केली जाऊ शकते. असे आहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उन्हाळ्यात आपण आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. ही बाब लहान मुले, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांसाठीच लागू पडते. आहार तज्ज्ञांच्या नुसार, उन्हाळ्यात दिवसभरात चार पाच लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश करा, जर एखाद्या व्यक्तीने उष्माघात टाळण्यासाठी घरी काही गोष्टी केल्या तर तो उष्माघातापासून सहज बचावू शकतो.
दुपारच्या सूर्यप्रकाशाचे तीव्र सूर्यकिरणे थेट डोक्यावर पडली तरच स्ट्रोकचा धोका खूप जास्त असतो. याशिवाय दुपारी सॅलड आणि डाळी यासारख्या गोष्टी जास्त खा. या ऋतूत पपई, खरबूज आणि टरबूज सर्वात फायदेशीर असतात. तुमच्या आहारात या फळांचा समावेश नक्की करा. दररोज कच्चा कांदा खा आणि चार लिटर पाणी प्या. दर तासाला किमान एक ग्लास पाणी प्यायला विसरू नका. शरीर डिहायड्रेटेड राहिले आणि तुम्ही बाहेर गेलात तर उष्माघात होण्याची शक्यता नक्कीच असते.
भाज्यांमध्ये, भोपळा किंवा हिरव्या पालेभाज्या सारख्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. कारण त्यात ९०% पाणी असते. जास्त धान्य खाऊ नका, जास्तीत जास्त डाळी आणि भाज्या खा किंवा फक्त सॅलडने पोट भरण्याचा प्रयत्न करा, भोपळा आणि पालकाचा रस. तुम्ही हा साधा रस घरी बनवू शकता. जर तुम्ही दररोज एक ग्लास हे प्यायले तर ते फायद्याचे ठरेल.
उन्हाळ्यात जेव्हाही तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमचे डोके सुती कपड्याने व्यवस्थित बाधायला विसरू नका. जर तुम्ही गाडी चालवत असाल तर गाडी चालवताना हेल्मेट घाला आणि बाहेरून घरी आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. तुमच्या शरीराला खोलीच्या तापमानावर थोडा आराम द्या. त्यानंतरच पाणी प्या. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही उष्माघातापासून नक्कीच सुरक्षित राहाल. त्यासोबतच प्रत्येक अर्ध्या तासाने पाणी प्यावे.
दिवसभरात किमान तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यावा. काकडी, टोमॅटो, टरबूज, खरबूज, दाक्ष यासारख्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करावा, लिंबू पाणी मीठ घालून दिवसभरात एकदा तरी ध्या. नारळ पाण्याचा उपयोग करा. कारण नारळ पाण्यामध्ये असणाऱ्या खनिजांमुळे मॅग्नेशियम, पोटॅशियम लोह यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवता येते. दही आणि ताक प्यावा. थकवा कमी जाणवतो. कोकम सरबत, आमसूल प्यावा. युरीन व्यवस्थित पास होण्यासाठी आमसूल आणि कोकम सरबत यामध्ये अद्रक घालून पिल्यास त्याचा अत्यंत चांगला परिणाम होतो. आणि शरीरातील नको असणारे घटक बाहेर टाकल्या जातात. थंड पाण्यामध्ये चंदन किंवा वाळा घालून ते प्यायलास शरीराची उष्णता कमी करता येऊ शकते. धने, बडिशोप आणि जिरे, यांची पावडर असल्यामुळे वन फोर चमचा एक ग्लास पाण्यात मिसळून ते पाणी रोज प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी करता येऊ शकते. अती तेलकट पदार्थ खाऊ नका.