Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादउल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध - जिल्हाधिकारी

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी

जालना : उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-2027 या केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेला जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून, यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. अशी सुचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केली.

केंद्र शासनाने आदेशित केल्यानूसार जिल्ह्यात उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-2027 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी माहिती घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल होत्या. बैठकीच्यावेळी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या योजनेची तथा राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेबाबतची  इत्यंभूत माहिती देण्यात आली. उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाबाबत तालुकानिहाय माहिती घेण्यात आली. यावेळी अंबड, परतूर व जालना शहर महापालिका व त्यांच्या अखात्यारित असलेल्या शाळांतील शिक्षकांची या योजनेस अपेक्षित प्रतिसाद दिसून आला नाही. याबाबत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी नाराजी व्यक्त केली. या योजनअंतर्गत असाक्षरांना वाचन, लेखन व संख्याज्ञानचे ज्ञान देण्यासाठी स्वयंसेवकामार्फत सन 2025-26 मध्ये एकुण 16988 असाक्षरांना साक्षर करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 13 हजार 399 असाक्षरांची प्रत्यक्ष नोंदणी करण्यात आलेली आहे. यावेळी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बातमी तयार करा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments