Friday, October 31, 2025
Homeऔरंगाबादउबाठा कामगार सेनेचे डॉ. प्रशांत काकडे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

उबाठा कामगार सेनेचे डॉ. प्रशांत काकडे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

उबाठा कामगार सेनेचे डॉ. प्रशांत काकडे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

उबाठा कामगार सेनेचे माजी सरचिटणीस डॉ. प्रशांत काकडे यांनी शुक्रवारी आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, सुहास माटे उपस्थित होते. डॉ. काकडे यांच्यासमवेत कामगार सेनेच्या शेखर पवार, वर्षा माळी, विजय हरिहर, बाबुलाल पुजारी या कार्यकर्त्यांनी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस नेते गिरीश मसुरकर यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

श्री. चव्हाण यांनी सांगितले की डॉ. काकडे हे कामगार क्षेत्रातील धडाडीचे कार्यकर्ते आहेत. विमानतळ सेवा क्षेत्रात विदेशी कंपन्यांना बंदी करावी, अशी मागणी डॉ. काकडे यांनी पूर्वीपासून केली होती. मात्र उबाठा सेनेने या मागणीकडे दुर्लक्ष केले. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने विमानतळ सेवा क्षेत्रात परदेशी कंपन्यांना बंदी करण्याचा निर्णय घेतला. कामगार हितासाठी मोदी सरकार व फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे डॉ. काकडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामगार हितासाठीच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यासाठी भाजपा संघटना पूर्णपणे प्रयत्न करेल, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

डॉ. काकडे हे उबाठा सेनेत गेली 35 वर्षे विविध पदावर कार्यरत होते. शिक्षण, कामगार क्षेत्रात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. पक्षाच्या विविध आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments