तिरुपती-हिसार-तिरुपती दरम्यान नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम मार्गे विशेष गाड्या
प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचा विचार करून, रेल्वेने विविध गंतव्यस्थानां दरम्यान पुढील प्रमाणे विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे:
गाडी क्र. 07717/07718 तिरुपती – हिसार – तिरुपती (साप्ताहिक विशेष, 24 फेऱ्या):
गाडी क्र. 07717 तिरुपती ते हिसार हि विशेष गाडी तिरुपती येथून दिनांक 09.07.2025 ते 24.09.2025 दरम्यान दर बुधवारी रात्री 23.45 वाजता सुटेल आणि हिसार येथे शनिवारी दुपारी 14.05 वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. 07718 हिसार ते तिरुपती हि विशेष गाडी हिसार येथून 13.07.2025 ते 28.09.2025 दरम्यान दर रविवारी रात्री 23.15 वाजता सुटेल आणि तिरुपती येथे बुधवारी सकाळी 11.30 वाजता पोहोचेल.
या विशेष गाड्या आपल्या प्रवासात रेनिगुंटा, रझमपेट, कड्डपा, येर्रगुंटला, ताडीपत्री, गुत्ती, गुंटकळ, धोन, कुर्नूल सिटी, गदवाल, महबूबनगर, जडचर्ला, काचेगुडा, मलकाजगिरी, मेडचल, कमारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव जं., नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मन्दसौर, नीमच, चित्तौडगड, भीलवाडा, बिजैनगर, नसीराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा जं., रिंगस जं., सीकर जं., नवालगढ, झुंझुनू, चिरावा, लोहारू जं. आणि सादुलपूर जं. येथे थांबतील. या गाड्यांमध्ये AC III Tier डबे असतील.
गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे
