ट्रम्पने टॅरिफ युध्द थांबविले नाही तर याचा वनवा भयानक रूप धारण करू शकतो;सावधान!
टॅरिफ युध्द केव्हा थांबणार!टॅरिफच्या ओढताडमध्ये जागतिक व्यापार युध्द भडकले आहे.एकमेकांचे कट्टर वैरी चीन आणि अमेरिका यांचा टॅरिफ भडका जगात वनव्यासारखा पसरत आहे.यामुळे सर्वत्र चिंतेचे आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.ट्रम्प स्वतःही बुडत आहे आणि दुसऱ्यालाही घेऊन बुडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते.यालाच म्हणतात; विनाशकारी विपरीत बुद्धी!ट्रम्पच्या तानाशाहीमुळे अमेरिका जगासाठी कलंकित राष्ट्र सिध्द होत आहे.अमेरीकेने अफगाणिस्तानला धोका देवून रक्ताच्या लाथोळ्यात सोडले तर युक्रेनला युध्दाच्या खायीत लोटुन स्वतः पळ काढला आहे. यावरून स्पष्ट होते की अमेरिका कोणाचाच नाही.कारण टॅरिफच्या माध्यमातून अमेरिकेने व्यापार युध्दाची आग संपूर्ण जगात लागली आहे.अमेरिका आता सुपर पॉवर रहालेला नसुन जगात सर्वात मोठा स्वार्थी व घमंडी देश बनला आहे. त्यानी यापुर्वीही अफगाणिस्तानसह अनेक देशांना धोका देवून आपले हित साधले आहे आणि आता युक्रेनला मरण्यावर सोडले आहे.कारण अमेरिकेची दुसऱ्यांदा ट्रम्पला मिळालेली सत्ता आता जगासाठी डोकेदुखी व घातक सिद्ध होत असून ट्रम्प सत्तेचा दुरूपयोग करतांना दिसत आहे हे दृश्य संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. ट्रम्पच्या मनमानीमुळे आता अमेरिकेचा सुपर पॉवरचा दर्जा दिवसेंदिवस खालावतांना दिसत आहे.कारण ट्रम्पच्या बाजार नितिमुळे संपूर्ण जगात भुचाल निर्माण झाला आहे.कारण ट्रम्पच्या आडमुठ्या धोरणामुळे रशिया-चीन सारखे अमेरिका विरोधी देश अमेरिकेच्या मित्र देशांना जवळ घेत आहे.यामुळे अमेरिकेचा जो दबदबा जगात होता तो हळूहळू निवळतांना दिसतो आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अतिरिक्त आयात शुल्क मागे न घेण्याची आडमुठी भूमिका आणि त्याचवेळी या आयातशुल्काला जोरदार प्रतिकार करण्याची चीनने दाखविलेली तयारी याचे पडसाद शेअर बाजारात सोमवार दिनांक ७ एप्रिलला उमटले.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२२६.७९ अंकांनी कोसळून ७६,१३७.९० वर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७४२.८५ अंकांनी कोलमडत २२,१६१.६० वर बंद झाला.जगभरातील बहुतांश शेअर बाजार पडल्यामुळे गुंतवणूकदारांनी एकाच दिवशी ९.५ लाख कोटी डॉलर गमावले.त्यामुळे सोमवार हा बाजारासाठी “ब्लॅक मंडे”ठरला हा संपूर्ण परिणाम ट्रम्पच्या आडमुठेपणामुळे निर्माण झाला आहे.आज ट्रम्पच्या चुकीच्या धोरणांमुळे अमेरिकेतील लोक रस्त्यावर उतरले आहेत.यावरून आपण समजू शकतो की सध्याच्या परिस्थितीत ट्रम्पचे डोके ठीकाण्यावर नसल्याचे स्पष्ट दिसून येते.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल ६० देशांवर लादलेल्या टॅरिफ शुल्काचा परिणाम जगभरात जानवण्यास सुरूवात झाली असून, जगातील संपूर्ण शेअय बाजारात जनुकाय भुचाल आला की काय असे सर्वत्र दृश्य दिसत आहे .त्यामुळे सोमवारला सर्वत्र हाहाकार उडाला.खुद्द अमेरिकेसह जगभरातील सर्वच शेअर बाजार धाराशाही झाले व कोट्यावधींचे नुकसान करत बंद झाले.एकट्या भारताचा विचार केला तर शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे तब्बल १४.०९ लाख कोटी रुपये बुडाले हा संपूर्ण परिणाम ट्रम्पच्या हेकेखोर पणामुळे निर्माण झाला आहे.टॅरिफ मागे घेण्यास ट्रम्प यांनी नकार दिल्याने जागतिक व्यापाराला धक्का बसला आहे आणि आता ट्रम्प यांनी चीनला नव्याने वाढीव शुल्काची धमकी दिली.त्यामुळे जगभरात अस्थिरता व अनिश्चितता निर्माण झाली आहे.अमेरिकेच्या शेअर बाजाराप्रमाणे पुढील काही दिवस जगभरातील बाजार कोसळत राहतील अशी भीती व्यक्त होत आहे.सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि चीन यांची वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे आणि ही लढाई कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर मंगळवारी व्हाईट हाऊसने चीनवर तब्बल १०४ टक्के टॅरिफ लादला असुन तो तो ताबडतोब लागु होणार आहे.सोबतच अमेरिकेने चीनला चेतावणी दिली आहे की जर चीनने अमेरिकेवर लादलेला ३४ टक्के कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त ५० टक्के कर लादला जाईल ही बाब ट्रम्पने करून दाखविली त्यामुळे येणारा काळ अत्यंत कठीण असल्याचे दिसून येते.जगात अनेक देशांत गृहयुद्ध सुरू आहे.सोबतच इराण- अमेरिका- हमास-हुती विद्रोही-इजरायल यांचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे तर दुसरीकडे युक्रेन-नाटो-रशिया एकमेकांवर आगीचे गोळे बरसवितांना दिसतात अशाप्रकारे अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झाली आहे आणि काही ठिकाणी आरपारची लढाई सुरू आहे.यामुळे आज जगातील प्रत्येक देशात महागाई, बेरोजगारी,भुकमरी,जल समस्या, नैसर्गिक महाप्रलय इत्यादीसह अनेक नवीन-नवीन समस्या निर्माण होत आहे व झुंज देत आहे.आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धामुळे संपूर्ण व्यापार यंत्रणा गडगडल्याचे दिसून येते व याचा परिणाम आज जगातील प्रत्येक देशांना भोगावा लागतो आहे.ज्या अमेरिकेने टॅरिफ वाढीची सुरूवात केली आज त्याच अमेरिकेत ट्रम्पच्या नितीचा मोठा विरोध सुरू आहे. कारण टॅरिफच्या अवाढव्य वाढीमुळे जागतिक बाजारपेठेला मोठा धक्का बसला आहे.याचा परिणाम पुढे चालून भयानक रूप धारण करू शकतो.कारण ट्रम्पच्या या चुकीच्या धोरणांमुळे अनेकांना आपला रोजगार सुध्दा गमवावा लागत आहे किंवा गमवावा लागणार आहे.जगातील उलाढाल पहाता ट्रम्पच्या टॅरिफ नितीवर इलॉन मस्क नाराज असुन त्यांच्या या चुकीच्या धोरणांचा विरोध करतांना दिसतात. कोणताही देश असो,बलशाली झाला म्हणून मनमानी करू नये कारण गर्वाचे घर केव्हा खाली पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सावधान ट्रम्प महोदय! ट्रम्पने सर्वांनाच परवडेल या पध्दतीने टॅरिफ लावायला पाहिजे तेव्हाच जागतिक बाजारपेठेत समतोल दिसून येईल.अन्यथा अनेक नवीन-नवीन समस्या निर्माण होण्यास प्रारंभ होईल हेही तितकेच सत्य आहे.जय हिंद!
– लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(स्वतंत्र पत्रकार)
