Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादतथागत भगवान बुध्द यांच्या २५६९ व्या जयंती निमित्त धम्मसेदना, कँडल मार्च व...

तथागत भगवान बुध्द यांच्या २५६९ व्या जयंती निमित्त धम्मसेदना, कँडल मार्च व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

तथागत भगवान बुध्द यांच्या २५६९ व्या जयंती निमित्त धम्मसेदना, कँडल मार्च व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन
आत्ताच एक्सप्रेस 
सोयगाव/ प्रतिनिधी /सोयगाव तालुक्यातील निसर्गरम्य अजिंठा लेणी परिसरात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इंन्स्टिट्युट ऑफ पाली अॅण्ड बुध्दीझम ७४ एकर परिसरातील धम्माचल फर्दापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सालाबादप्रमाणे वैशाख पौर्णिमा च्या दिवशी, दि.१२ मे २०२५, सोमवार रोजी सकाळी १०:०० वा. संतगार मध्ये त्रिशरण, अष्टशील, पुजापाठ, परित्राण सुत्र पाठ करण्यात येवून. दिवसभर भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून सायंकाळच्या सत्रात ठीक ७ वा. पुण्यनगरी फर्दापूर गावामध्ये कॅन्डल रॅली काढण्यात येणार यावेळी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित रहातील या अभिवादन कार्यक्रम तालुक्यातील गावागावांतील उपासकांनी पुण्य अर्जीत करण्यासाठी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भिख्खू बोधिधम्मा यांनी केले आहे.
भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खु संघ) यांच्या मार्गदर्शनाखाली तथागत भगवान बुध्द यांच्या २५६९ व्या जयंती निमित्त धम्मसेदना, कँडल मार्च व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या  निमित्ताने फर्दापूर , सोयगाव तालुका परिसरातील येथील सर्व धम्मप्रेमी उपासक उपासिकांना कळविण्यात येते की तथागत भगवान बुद्ध यांच्या २५६९ वी (वैशाख पौर्णिमा) तथागत भगवान बुध्द यांची जयंती साजरी करण्यात येत असते, बुद्ध धम्मात वैशाख पौर्णिमेला अत्यंत पवित्र मानले जाते. कारण याच दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म, तथागत भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्ती व तथागतांचे महापरिनिर्वाण झाले. वैशाख पौर्णिमा हा बौद्धांचा सर्वात मोठा सण आहे कारण अनेक कल्पा नंतर तथागत भगवान बुद्ध दहा पारमिता तीन वेळा पूर्ण करून या भूतलावर माणसाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी जन्माला येत असतात. तथागत भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सर्व संसाराचा त्याग करून सहा वर्षे दीर्घ तपस्या करून या जगातील सर्वात श्रेष्ठ सत्य व आर्य अष्टांगिक मार्गाचा शोध लावला आणि माणसाला अज्ञानातुन व दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग शोधून काढला आणि जगाच्या हितकल्याणासाठी शील, समाधी, प्रज्ञा, करुणा, मैत्री, मुदता, उपेक्षा आणि समतेची शिकवण दिली. भारत देशातच नव्हे तर ३३ देशात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते तेव्हा या दिवशी प्रत्येक उपासक उपासिकांचे आद्य कर्तव्य आहे की बुद्ध विहारात जाऊन बुद्ध पौर्णिमा साजरी करणे व धम्माचा लाभ घेणे तसेच आपल्यातील राग, द्वेष, मोह त्यातून मुक्त होण्याचा जो मार्ग बुद्धांनी दिला त्या धम्माचे श्रवण व अनुकरण करणे हे आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की या तथागत भगवान बुद्धांच्या शासन काळात आपल्याला जन्म मिळाला म्हणून धम्माचा लाभ घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा नंम्र आवाहन फर्दापुर येथील समस्त धम्मप्रेमी उपासक उपासिका व आयोजकांनी केले आहे.यावेळी खिरदान कार्यक्रम सुध्दा होणार आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments