Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादतीन दिवसात 15,000 बिर्याणीची विक्रमी ऑर्डर पूर्ण; सीएफसी हॉटेल शालिमारला स्विगीकडून सन्मान

तीन दिवसात 15,000 बिर्याणीची विक्रमी ऑर्डर पूर्ण; सीएफसी हॉटेल शालिमारला स्विगीकडून सन्मान

तीन दिवसात 15,000 बिर्याणीची विक्रमी ऑर्डर पूर्ण; सीएफसी हॉटेल शालिमारला स्विगीकडून सन्मान
समाजसेवक मुसा खानकडून मुनावर अन्सारी यांचे अभिनंदन.
छत्रपती संभाजीनगर: शहरातील ख्यातनाम सी एफ सी हॉटेल शालीमारने केवळ तीन दिवसात तब्बल 15,000 बिर्याणीच्या ऑर्डर्स पूर्ण करून ऐतिहासिक कामगिरी केली असून, या उल्लेखनीय यशाबद्दल स्विगी तर्फे हॉटेलचे मालक मनोहर अन्सारी यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
या विक्रमी कामगिरीमुळे शहरातील हॉटेल उद्योगात नवा इतिहास घडला असून, सर्वत्र हॉटेल शालीमारच्या टीमचे कौतुक होत आहे.
यावेळी शहरातील समाजसेवक मुसा खान यांनी हॉटेल शालीमारचे मालक मनोहर अन्सारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. मुसा खान म्हणाले की,
“शहराचे नाव उज्ज्वल करणारे हे यश प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. अन्सारी यांनी उत्कृष्ट सेवा, गुणवत्तापूर्ण भोजन आणि समर्पित टीमच्या बळावर हे यश मिळवले आहे.”
तीन दिवसात 15,000 बिर्याणीची यशस्वी डिलिव्हरी
स्विगी तर्फे मुनावर अन्सारी यांचा सन्मान
शहरात हॉटेल शालीमारचे कार्य कौतुकास्पद, इतिहास घडवणारी कामगिरी.
समाजसेवक मुसा खान यांच्याकडून विशेष सत्कार
ग्राहकांचा विश्वास, उत्तम टीमवर्क आणि जलद सेवा हे यशाचे प्रमुख घटक
सीएफसी हॉटेल शालीमारच्या या विक्रमी यशामुळे शहरातील खाद्यविश्वात अभिमानाची भर पडली आहे.
मुनावर अन्सारी यांचे अभिनंदन होत आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments