‘The 7 Deaths’ : नीता शर्मा कन्नड-तेलुगू सिनेमात पदार्पण करण्यास सज्ज; २०२६ मध्ये चित्रपटगृहांत येणार
मुंबई/प्रतिनिधी/ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लवकरच एका नव्या सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटाची एन्ट्री होणार आहे. ‘The 7 Deaths’ असे शीर्षक असलेल्या या बहुभाषिक चित्रपटातून अभिनेत्री नीता शर्मा आपले करिअर सुरू करत आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, एका ‘सायको किलर’ मुलीची थरारक कथा यात मांडण्यात आल्याचे समजते.
अजय कुमार दिग्दर्शित हा चित्रपट कन्नड, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, दिग्दर्शक म्हणून अजय कुमार यांचाही हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नीता शर्मा आणि अजय कुमार हे दोघेही त्यांच्या करिअरची नवी सुरुवात करत आहेत.
चित्रपटाचा टीझर नुकताच ‘सिरी म्युझिक’ या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. या टीझरने साऊथ सिनेसृष्टीत एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली आहे. टीझरमधून चित्रपटाचा गंभीर आणि रहस्यमय सूर दिसून येतो. यामध्ये एका निर्दयी ‘सायको किलर’ची झलक दाखवण्यात आली आहे, जी कोणत्याही क्षणी कोणाचीही हत्या करू शकते.
या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही मोठे आणि प्रथितयश कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. ‘The 7 Deaths’ या चित्रपटाद्वारे नीता शर्मा तिच्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
आपल्या पदार्पणाबद्दलची उत्सुकता ती सोशल मीडियावर सातत्याने व्यक्त करत आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. या चित्रपटाच्या घोषणेने केवळ दाक्षिणात्यच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. नीता शर्माच्या या पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट केवळ दक्षिणेतच नव्हे, तर देशभरात एक वेगळा ठसा उमटवेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
