तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारांची समाजाला गरज – कैलास गोरंटयाल
जालना/प्रतिनीधी/ शांतता प्रस्थापित करण्यासाठी विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार प्रेरणादायी असून त्यांच्या या मार्गदर्शक विचारांची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे असे प्रतिपादन माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी येथे बोलतांना केले.
जालना शहरातील अजंता बुद्धविहार,आनंदनगर आणि आदर्श नगर यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान बुध्द यांच्या २५६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोरंटयाल बोलत होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष अशोक नावकर,सदानंद टवले, शिवप्रकाश चीतळकर,संजय पाखरे,राहुल पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना माजी आमदार कैलास गोरंटयाल म्हणाले की,तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे शांतीचे विचार विश्वाने स्वीकारले आहे.भगवान बुध्दांच्या विचारात मोठी ताकत असून त्यांचे शांतीचे विचारच जगाला तारू शकतात असा विश्वास देखील गोरंटयाल यांनी यावेळी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे गोरंटयाल यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन सदानंद टवले यांनी केले.पौर्णिमा बौध्द धम्म महिला महासंघ,जेष्ठ नागरिक,बाल बालीका जयंती उत्सव समितीचे सचिव रवि शिंदे,अर्जून जाधव राजे, अशोकराव पंडित, अक्षय निवारण, सागर कदम,सुंदर साळवे,के.टी. हिवाळे,संजय वेव्हल, सोनाजी नावकर, भुजंगराव भिसे, हिम्मतराव मस्के,भिमराव पांडव, संजय खरात,परिसरातील उपासक हजर होते..कार्यक्रमा नंतर भोजन दान करण्यात आले.शेवटी आभार माधुरी वेव्हल मोरे यांनी मानले.
