Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादहिरापूर थापटी परिसरात झालेले आंदोलन कश्यासाठी

हिरापूर थापटी परिसरात झालेले आंदोलन कश्यासाठी

हिरापूर थापटी परिसरात झालेले आंदोलन कश्यासाठी

अवैध धंदे बंद करण्यासाठी की पुढाऱ्यांना हप्ते चालू करण्यासाठी
आत्ताच एक्सप्रेस
संभाजीनगर/प्रतिनिधी/ पैठण तालुक्यातील दिनांक सहा पासून दिनांक सवीस पर्यंत वीस दिवस चाललेला मुद्दा म्हणजे हिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेले कुलस्वामिनी कलाकेंद्र थापटी तांडा हिरापूर, देवगाव, ब्राम्हणगाव, रजापूर,आडुळ, कडेठाण,गेवराई,आंतरवली,दाभरूळ अदी सर्व गावांनी केलेले आंदोलन.
 सविस्तर माहिती अशी की आपल्या संपूर्ण गावाने आणि परिसरातील सर्व नागरिकांनी कुलस्वामिनी कलाकेंद्र बंद व्हावे म्हणून खूप मोठं आंदोलन केलेले सर्वांनाच कळतं.. चालू असलेले हे कलाकेंद्र अवैध आहे असं गावकरी म्हणतात. कलाकेंद्र बंद या साठी आंदोलन झाले पण, सुखी संसाराला आग लावणाऱ्या अवैध धंदे देशी, विदेशी दारू, चक्री, मटका बंद व्हावे. या साठी कुणी शब्द पण नाही काढला. पण गाव तर बंद करण्यासाठी तयार आहे पण दहा ते पंधरा गावातील जे सरपंच आणि सर्व पुढारी आहेत हे नेमकं काय करत आहे कारण यांनी जर ठरवले तर अशक्य काहीच नाही हे बंद होऊ शकते. पण अस आढळले आहे. की काही सरपंच सह काही नेते पुढारी तिथं नाचून आलेले आहेत आणि काही जणांनी तिथून मालकाकडून पैसे घेऊन त्यांना सांगितले की आम्ही फक्त आंदोलन करू आणि तुमचे कला केंद्र बंद होऊन देणार नाही आम्हाला ग्रामपंचायतला हप्ते चालू करून द्या. त्यामुळे मला असे सांगायचे आहे की सामान्य गावकऱ्यांना वाटते की कला केंद्र बंद होईल. पण हे काही बंद होणार नाही. कारण की या नेते, पुढार्‍यांना पैसे कमवायचे आहे. कला केंद्राच्या आडून आणि ही सामान्य जनता यामधून भरकटली जात आहे तर एक सांगायचे जी कला केंद्रातील कलाकार काम करतात त्यांचा देखील प्रश्न निर्माण होतो. की त्यांनी कुठे काम करावे त्यांनी त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कुठे भागवावा यांचा प्रश्न कोण सोडवेल त्यांना सुद्धा पोट पाणी आहे फक्त त्यांनी वाईट काम करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि जर असे झाले तर आंदोलन करून काही फायदा होणार नाही.त्यामुळे फक्त पुढार्‍यांचा फायदा होईल आणि हद्दीतील जे ग्रामसेवक ग्रामपंचायत सरपंच आहेत त्यांचा पुरेपूर फायदा होईल आणि सामान्य गावकऱ्यांना वाटेल की सरपंचांनी आपल्याला खूप मदत केली पण याच्यातून काहीही साध्य होणार नाही आणि याच्यातून फक्त आणि फक्त काही पुढारी लोकांचा लाभ होणार आहे, जर नेते पुढारी यांचा लाभ होणार असेल तर हे कला केंद्र बंद का करायचे तर या कला केंद्रावर काम करणाऱ्या मजूर कामगारांचा रोजगार का बुडवायचा ?
Previous article
Next article
ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकाराविरोधात गांधी चमनवर महिला काँग्रेसचे आंदोलन… मौन पाळून महिला काँग्रेसने व्यक्त केला घटनेचा निषेध… जालना शहरातील गांधी चौकात करण्यात आलं आंदोलन… ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकाराच्या विरोधात जालन्यात आज दिनांक 26 शनिवार रोजी दुपारी तीन वाजता गांधी चमन येथील महिला काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. मौन पाळत महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या घटनेचा तीव्र निषेध केलाय. जालना शहरातील गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी शहापूरच्या शाळेत विद्यार्थिनींना विवस्त्र करून मासिक पाळीची तपासणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकाराविरोधात राज्यभरात आज महिला काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यातही महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मौन पाळून त्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. यावेळी राज्यात महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली. सरकारचा निषेधार्थ मूक निदर्शने करण्यात आलीय. महिलां सुरक्षितच्या दृष्टीने सरकारला जागे करण्यासाठी मूक निदर्शनाचे आयोजन करण्यात आलय. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशाने मूक निदर्शने करण्यात आलीय. राज्यात वाढत असलेले अत्याचार होतं असल्याने महिलां सुरक्षित नाहीये. राज्य सरकार महिलां व मुलीविषयी निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप महिलां काँग्रेस जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी केलाय. तसेच महिलांवर होणारे सामूहिक अत्याचार, खून, मारहाण. थांबले पाहिजे अशी मागणी देखील नंदा पवार यांनी केलीय. यावेळी नंदा पवार जिल्हाध्यक्षा महिला कॉग्रेस कमिटी, लतिफा शेख, सविता गायकवाड, जया आठवले, सावित्री इंगळे, मनिषा चांदोडे, प्रतीक्षा खाडे, कोमल कामतीकर यांचं सह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments