ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकाराविरोधात गांधी चमनवर महिला काँग्रेसचे आंदोलन
मौन पाळून महिला काँग्रेसने व्यक्त केला घटनेचा निषेध
जालना शहरातील गांधी चौकात करण्यात आलं आंदोलन
ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकाराच्या विरोधात जालन्यात आज दिनांक 26 शनिवार रोजी दुपारी तीन वाजता गांधी चमन येथील महिला काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. मौन पाळत महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या घटनेचा तीव्र निषेध केलाय. जालना शहरातील गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी शहापूरच्या शाळेत विद्यार्थिनींना विवस्त्र करून मासिक पाळीची तपासणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकाराविरोधात राज्यभरात आज महिला काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यातही महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मौन पाळून त्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. यावेळी राज्यात महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
सरकारचा निषेधार्थ मूक निदर्शने करण्यात आलीय. महिलां सुरक्षितच्या दृष्टीने सरकारला जागे करण्यासाठी मूक निदर्शनाचे आयोजन करण्यात आलय. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशाने मूक निदर्शने करण्यात आलीय. राज्यात वाढत असलेले अत्याचार होतं असल्याने महिलां सुरक्षित नाहीये. राज्य सरकार महिलां व मुलीविषयी निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप महिलां काँग्रेस जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी केलाय. तसेच महिलांवर होणारे सामूहिक अत्याचार, खून, मारहाण. थांबले पाहिजे अशी मागणी देखील नंदा पवार यांनी केलीय.
यावेळी नंदा पवार जिल्हाध्यक्षा महिला कॉग्रेस कमिटी,
लतिफा शेख, सविता गायकवाड, जया आठवले, सावित्री इंगळे, मनिषा चांदोडे, प्रतीक्षा खाडे, कोमल कामतीकर यांचं सह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.