Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादउद्धव ठाकरेंनी मुंबई महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा द्यावा; हेमंत पाटील यांचे आवाहन

उद्धव ठाकरेंनी मुंबई महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा द्यावा; हेमंत पाटील यांचे आवाहन

उद्धव ठाकरेंनी मुंबई महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा द्यावा; हेमंत पाटील यांचे आवाहन

पुणे :- २० जानेवारी २०२६ मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी एक खळबळजनक विधान केले असून, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

‘नैसर्गिक युती’ पुन्हा होण्याची गरज

हेमंत पाटील यांनी म्हटले की, मुंबईच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतचे जुने मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडल्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर, ठाकरेंनी त्यांची ‘नैसर्गिक युती’ (शिवसेना-भाजप) पुन्हा एकदा जोपासली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ठाकरेंचा महापौर होणे शक्य?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा महापौर व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले:

  • संख्याबळाअभावी सध्या हे कठीण वाटत असले तरी अशक्य नाही.

  • ठाकरेंनी पुढाकार घेतल्यास भाजपकडूनही सकारात्मक पाऊल उचलले जाऊ शकते.

  • कदाचित ‘देवा’च्या मनात असेल तर शिवसेना (उबाठा) पक्षाचा महापौर नक्कीच होऊ शकतो.

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेना फोडून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी २९ नगरसेवकांच्या जोरावर अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली आहे. मात्र, निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमधील दुरावा समोर आला होता. भाजप पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी शिंदे सेनेविरोधात प्रचार केल्याचे चित्र होते. त्यामुळे शिंदे यांना ‘साईड ट्रॅक’ केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षणही हेमंत पाटील यांनी नोंदवले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments