टेंभुर्णीची सामाजिक एकी भाईचारा उत्तम:सचिन खामगळ
टेंभुर्णी येथे मानव सेवा मंडळाचे वतीने इफ्तार पार्टी संपन्न.
जाफ्राबाद तालुका/ प्रतिनिधी/ जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील जुन्या बस स्थानक येथील मस्जिद मध्ये या वर्षी ची पहिली इफ्तार पार्टी आयोजित करून टेंभुर्णी येथील भाईचारा चा संदेश या वेळी मानव सेवा कडून देण्यात आला.या वेळी या इफ्तार पार्टी साठी मानव सेवा चे प्रांत अध्यक्ष कृषी भूषण श्री नंदकिशोर काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या सोबत या वेळी सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के यांच्यासह पोलीस निरीक्षक सचिन खामगळ मानव सेवा चे प्रांत सचिव शेख नसीम सर ज्येष्ठ समाज भूषण पीजी तांबेकर सर माजी ग्रामपंचायत सदस्य मोइन भाई बागवान भिकन पठाण माजी सरपंच लक्ष्मण शिंदे विष्णू जमधडे माजी उपसरपंच फैसल चौऊस उपसरपंच शिवाजी शिंदे यांच्यासह मानव सेवा मंडळाचे स्थानिक शाखा चे अध्यक्ष संजय राऊत सचिव अलकेश सोमानी, संतोष शिंदे,दत्तातेय मुनेमानिक, गोविंद जाधव, साई बोर्डे, भागाजी वाघमारे,रावसाहेब अंभोरे, बालू मगर,शैलीप्रकाश वाघमारे,भिका मामा, मुकुंदराव औटी, रविंद्र उखर्डे अशपाक भाई ,अशोक पाबळे, शेख फकरू मुस्ताक बागवान, सुनील अंभोरे यांच्यासह अनेक हिंदू मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.
या छोट्या खाणी कार्यक्रमात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्दू शिक्षक शेख साबेर यांनी केले यावेळी आपल्या भाषणातून सांगताना येथील ठाणे प्रमुख श्री सचिन खामकर यांनी सांगितले की सोशल मीडियाच्या नादात तरुण मंडळी मोठी गुरफटल्या गेली असल्या कार्यक्रमाने चांगला मेसेज जाऊन एक चांगला प्रभाव पडेल असे सांगून आयोजीत केलेल्या कार्यक्रम बद्दल मानव सेवा मंडळाचे त्यांनी आभार मानले. अश्या कार्यक्रमाची सध्या गरज असून या कार्यक्रमातून भाई चारा चांगला होईल अशी अशा व्यक्त करून सगळे सण येथे चांगले साजरे होतात गुण्यागोविंदाने साजरे होतात हे चांगले, अशी आपली भावना श्री सचिन खामगळ यांनी व्यक्त केली. यावेळी संजय राऊत शेख साबेर सर आणि गौतम म्हस्के पी जी तांबेकर यांनी समायोजित भाषणे केली.