तहसील प्रशासनाचा नाकर्तेपणा शेतकऱ्याचा रस्त्यासाठी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती व उपोषण देखील करण्यात आले होते त्यावेळी अधिकाऱ्याकडून बोलण्यात आले होते की आपली मागणी दोन दिवसात पूर्ण करण्यात येईल. परंतु सदर मागणी पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी बाबासाहेब श्री हरी नजन यांनी दिला आहे. काय आहे मागणी कायगाव येथील नजनवस्ती ते अहील्यादेवी बारव येथे जाणारा शिवरस्ता (सरकारी रस्ता) जे.सी.बी. द्वारे उकरून बंद केला असुन सदर रस्ता चालु करण्यासाठी आमरण उपोषन करण्यात आले होते. दोन दिवसात रस्ता मोकळा करून देण्यात येईल अशा तोंडी आश्वासन देण्यात आले होते अशी माहिती श्रीहरी नजर यांनी दिली आहे. त्याबाबत आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसुन सदर रस्त्याचे प्रश्न मीठेपर्यंत पुन्हा उपोषण करण्याचा इशारा शेतकरी बाबासाहेब श्री हरी नजन यांनी दिला आहे. उपअधिक्षक भुमी अभिलेख यांचे पत्र जा.क्र.२०२५/महसुल / जमा-१/रस्ता/कावी-१४९ दिनांक १०/०७/२०२५ रोजीचे.एम.ए.जी. ०४/०८/२०२५ उपअधिक्षक भुमी अभिलेख यांचे
पत्र जा.क्र.२०२५/महसुल / जमा-१/रस्ता/कावी-१५३ दिनांक २१/०७/२०२५. तहसिल कार्यालय दिनांक २२/०७/२०२५ रोजी तहसिल कार्यालय समोर सकाळी ११ वाजे पासुन आमरण उपोषण केले असता त्यावेळी अधिकाऱ्याकडून स्वतः येउन तोंडी आश्वासन दिले व आपला मान ठेउन आम्ही उपोषण सोडले तरी आमचा प्रश्न मिटला नाही. कायगाव येथील नजनवस्ती ते अहील्यादेवी बारव कडे जाणारा शिवरस्ता हा आप्पासाहेब गोपाळ गायकवाड रा. कायगाव यांनी दिनांक १०/०७/२०२५ रोजी जे.सी.बी. द्वारे गट नं. ९८ मधील रस्ता हा खोदुन बंद केला आहे. हा रस्ता जोपर्यंत तहसील प्रशासनाकडून मोकळा करून देण्यात येत नाही. तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर दिनांक (११) ऑगस्ट पासून सहकुटुंब व शेतकऱ्यांना घेऊन सोबत आमरण उपोषण सुरू राहणार अशी माहिती बाबासाहेब श्री हरी नजर यांनी दिली.