राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती तर्फे समाजसेवक मुनव्वर अन्सारी यांना सन्मानित
भ्रष्टाचार विरोधी समितीच्या 66 वा वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा.
औरंगाबाद भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच भ्रष्टाचार विरोधी समितीच्या संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबेर यांच्या वाढदिवसानिमित्त मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हॉटेल शालिमार येथील संचालक तथा समाजसेवक मुनव्वर अन्सारी यांना समाज रत्न पुरस्काराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय चे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे, आरटीओ कठोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले आहे.
मुनव्वर अंसारी हे पंधरा-वीस वर्षापासून हॉटेल व्यवसायात अग्रेसर आहेत.
तसेच हॉटेलच्या माध्यमातून अनेक गरिबांचे कामे केलेले असून तसेच आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे म्हणून भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे त्यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत.
यावेळी व्यासपीठावर सय्यद साबेर,डॉक्टर शिवाजी सुक्रे, आरटीओ काठोळे साहेब, झकिया बाजी सय्यद साबेर तसेच पत्रकार अब्दुल कय्यूम, अशरफ खान,मुसा खान,अलीम बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.