टाकळी अंतुर येथील न्यायाधीशांच्या स्वीय सहाय्यक पदी प्रियंका काळे यांची निवड
कन्नड /प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील टाकळी अंतूर येथील प्रियांका माधवराव काळे हिची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथील न्यायाधीशांच्या वैयक्तिक सहायकपदी नियुक्ती झाली आहे. प्रियांका हिची नोव्हेंबर २०२४ मध्ये एमपीएससीमार्फत मुंबईतील मंत्रालयात उच्चश्रेणी लघुलेखकपदी निवड झाली होती. याबद्दल तिचा प्रदेश अध्यक्ष सोशल मीडिया भाजप निवृत्ती सपकाळ यांनी सत्कार केला यावेळी परिसरातून कौतुक होत आहे