तलावात पडलेल्या चतुर कोल्ह्याला वाचवले
कडा/प्रतिनिधी/ आष्टी तालुक्यातील शिरापुर येथे दोन दिवसापासून शेत तलावात पडलेल्या कोल्हयाची कडा येथील जीवदया फाऊंडेशन च्या प्राणीमित्राकडून जीवदान दिल्याची घटना घडली, याबाबत माहीती अशी की शिरापुर येथील रामदास देवकर यांच्या शेततलाव मध्ये दोन दिवसा पासून एक राखाडी कोल्हा पडलेला होता, कोल्हाने वर येण्यासाठी खुप प्रयत्न केले परंतु त्याला वर येत नसल्याने तो पाण्यात धडपडत होता हे पाहून युवराज देवकर यांनी कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना या घटनेची माहीती दिली माहीती मिळताच आपल्या जीवदया टिम ला सोबत घेऊन शिरापुर गावात गेले शेत तलावातील कोल्हा पोहून पोहून दमला होता त्याचा जीव कासावीस झाला होता तरीही तो चतुरपणा दाखवत पाण्यात चकवा देत होता अखेर धाडस दाखवत त्याला काढण्यात यश आले. तलावात उतरून कोल्ह्याचा जीव वाचवण्यासाठी प्राणीमित्र नितीन आळकुटे, राजु भोजने, शैलेंद्र मिश्रा, गणेश पवळ यांनी प्रयत्न करत त्याला सुखरूप बाहेर काढले, बाहेर काढलेला चतुर कोल्हा पंधरा मिनिटं शांत बसून पुन्हा निसर्गात धूम ठोकली.कुठेही वन्यजीव सकटात असल्यास कडा येथील जीवदया टीम कळवावे.