तब्बल १८ वर्षानंतर स्नेहसंमेलना निमित्त जमले पुन्हा एका वर्गात
आत्ताच एक्सप्रेस
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी /छत्रपती संभाजीनगर विद्यालय वाकूळणी ता. बदनापूर येथील दहावीच्या २००५-०६ वर्गातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलन साजरे केले, वास्तविक पाहता दहावीनंतर एकत्र येणे आपआपले सुखदुःख आपल्या बाल मित्रांना सांगणे यात खूप आनंद आहे, त्यावेळी दहावी वर्गातील विद्यार्थी रविशंकर कळमकर,सचिन दिवटे,मंगेश काळे,दीपक खाडे व अंजली हुसे यांच्या संकल्पनेतून एक व्हाट्सएप ग्रुप तयार करण्यात आला यातून दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम केले, शिक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तब्बल १८वर्षांनी परस्परांना भेटताना सर्वांना आनंदाने भरून आले होते, सर्व विद्यार्थी जमा झाल्यानंतर सुरवातीला शिक्षकांचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले त्यानंतर दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, विद्यार्थ्यांनी परस्परांच्या कौटुंबिक व व्यावसायिक माहितीची देवाणघेवाण झाली,प्रास्ताविक मनीषा घाडगे व उषा पालवे यांनी केले, त्यानंतर विद्यार्थी व शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले बऱ्याच विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करताना जुन्या काळातील आठवणींनी भरून आले होते,मनोगत व्यक्त केल्यानंतर वर्गातील मृत्यू झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शाळेच्या स्थापनेपासून प्रथमच एक कल्पक व नाविन्यपूर्ण उपक्रम या तुकडीने राबवला या उपक्रमाची दखल घेऊन इतर विद्यार्थ्यांनी विद्यालयात नवीन सोईसुविधा उपलब्धता होण्यास मदत होईल असे मत श्री खरात यांनी व्यक्त केले
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य नलावडे,तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे , ईश्वर बहुरे, अण्णासाहेब पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ विठ्ठल शेळके, अनिरुद्ध खांडेभराड, सोपान लबडे, रामेश्वर काळे, कृष्णा लबडे, भगवान पालवे, सुदाम पुंड, सुदाम ढोबळे, रवि डोळे, राहुल मुंडे, उमेश बोंडारे आदी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल हुसे यांनी केले.