Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस महावितरणची स्वच्छता मोहीम; दहा हजारांहून अधिक रोहित्रे, विद्युत खांब केले वेलीमुक्त

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस महावितरणची स्वच्छता मोहीम; दहा हजारांहून अधिक रोहित्रे, विद्युत खांब केले वेलीमुक्त

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस महावितरणची स्वच्छता मोहीम;

दहा हजारांहून अधिक रोहित्रे, विद्युत खांब केले वेलीमुक्त

छत्रपती संभाजीनगर : ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेसाठी रोहित्रे तसेच खांबांवरील वेली व झुडपे काढण्यासह उपकेंद्रांतही स्वच्छता करण्याची मोहीम छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 14 ऑगस्ट रोजी राबविण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात 3386, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात 3451 व जालना मंडलात 3724 अशा एकूण 10 हजार 561 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी विविध ‍ठिकाणी स्वतः पाहणी करीत मोहिमेत सहभाग घेतला.

          विद्युत सुरक्षिततेचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच विद्युत यंत्रणा सुरक्षित ठेवण्याचे काम महावितरण करते. तथापि, पावसाळ्यात रोहित्रे, विद्युत खांबावर वेली व झाडेझुडपे वाढलेले दिसतात. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि सुरक्षा उपाययोजना म्हणून परिमंडलात एकाचवेळी विद्युत खांब व रोहित्रांवरील वेली व झुडपे काढण्याची मोहीम स्वयंस्फूर्तीने  गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत राबविण्यात आली. परिमंडलातील सर्व अभियंते व जनमित्रांनी ही मोहीम यशस्वी केली. वेलींनी वेढलेली रोहित्रे, खांब व नंतर ते वेलीमुक्त केल्याची छायाचित्रे घेऊन परिमंडल कार्यालयास अहवाल पाठविण्यात आला. अनेक ठिकाणी उपकेंद्रांतही स्वच्छता करण्यात आली. ही मोहीम यापुढेही नियमित सुरू राहणार आहे.

नागरिकांना कुठे धोकादायक विद्युत यंत्रणा आढळली तर त्वरित त्याची माहिती महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयास अथवा स्थानिक नियंत्रण कक्षाच्या 7066042412 (छत्रपती संभाजीनगर शहर मंडल), 7875756652 (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडल), 7875764144 (जालना मंडल) या क्रमांकावर अचूक स्थळासह व्हॉट्सअपद्वारे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments