स्वानंद सार्वजनिक वाचनालयात ” चला घडवूया विकसित महाराष्ट्र ” समारोप कार्यक्रम संपन्न
केज/प्रतिनिधी/ स्वानंद सार्वजनिक वाचनालयात ” चला घडवूया विकसित महाराष्टू २०४७जाणिव जागृती कार्यक्रमाचा १७ जुलै २०२५ रोजी पोस्टर प्रदर्शन या जाणीव जागृती कार्यक्रमाने समारोप करण्यात आला.
१८ जुन ते १७ जुलै २0२५ ” चला घडवूया विकसित महाराष्ट्र २०४७ महाराष्ट्राचे व्हिजन अधूमेंट्स, नियोजन विभाग: महाराष्ट्र शासन ” नागरिक सव्हेक्षण: कालावधी १८ जुन ते १७ जुलै २०२५ अंतर्गत पोस्टर प्रदर्शन, माहिनी व जनजागृती कार्यशाळा घेवून या online सव्हेक्षणाची जाणीव जागृती गांवात करण्यात आली.
गांवातील बऱ्याच लोकांनी या online सव्देक्षणात भाग घेवून माहिती online केली व अभिप्राय ही दिले.
स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज. जि. बीड यांच्या सौजन्याने हि जनजागृती करण्यात आली. या कालावधीत वाचक, युवक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला.
अभिप्राय देणाच्या मध्ये प्रामुख्याने ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसुदेव ( बप्पा) गायकवाड, माजी सरपंच ज्ञानेश्वर ( माऊली) गायकवाड, माजी उपसरपंच बालासाहेब गायकवाड, रविंद्र गायकवाड( पेन्टर), बाळासाहेब गायकवाड, पांडूरंग गायकवाड, रावसाहेब गायकवाड, ग्रंथालयाचे आनंद( भैय्या) गायकवाड यांचासह अनेकांनी ग्रंथालयाच्या अभिप्राय रजिस्टर मध्ये अभिप्राय लिहिले,
वैजनाथ गायकवाड, मंचक वैरागे, बालासाहेब वैरागे, ह.भ.प. नारायण गायकवाड, प्रतिक्षा चौरे, अश्विनी वैरागे, लक्ष्मी वैरागे, रामराव गायकवाड, प्रभू गायकवाड, यांच्यासह अनेकांनी सक्रीय सहभाग घेतला.