स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा
वर्धापन दिन उत्साहात साजरा
जालना/प्रतिनिधी/ जालना येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचा 21 वा वर्धापनदिन मंगळवार दि. 12 ऑगस्ट रोजी संस्थेच्या विविध 15 शाखांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणराव देशपांडे, सुभाष भाले, रमेश देहेडकर, कैलास खंडेलवाल यांची तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, उपाध्यक्ष कैलास पवार, सचिव प्रसन्ना जाफ्राबादकर, संचालक गणपतराव जोशी यांची उपस्थिती होती.
वर्धापन दिनानिमित्त संस्थेने सुरु केलेल्या ‘भगिनी निवेदिता ठेव वृद्धी योजना’ व ‘सुवर्ण योग’ सोने खरेदी योजना या दोन विशेष योजनांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी संस्थेच्या दोन दशकांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, ग्राहकांचा विश्वास आणि सदस्यांचा सहभाग हीच आमची खरी ताकद आहे. नव्या योजनांमुळे महिलांना बचतीची सवय लागेल तसेच सुवर्ण खरेदीसाठी सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध होईल. भगिनी निवेदिता ठेव वृद्धी योजनेमुळे महिला वर्गाला आकर्षक व्याजदरासह बचतीत वाढ करता येईल, तर ‘सुवर्ण योग’ योजनेतून सदस्यांना सोने खरेदीसाठी नियोजनबद्ध बचत करण्याची संधी मिळेल. या योजना केवळ आर्थिक सुरक्षिततेसाठीच नव्हे तर भविष्यातील गरजांसाठीही उपयुक्त ठरतील, असे ते म्हणाले. कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनीही संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करत नव्या योजनांना शुभेच्छा दिल्या.