सुंदरराव सोळंके महाविद्यालयात दीक्षांत सोहळा संपन्न
माजलगाव/ प्रतिनिधी / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत सुंदरराव सोळंके महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा महाविद्यालयीन स्तरावर संपन्न झाला. यावेळी मार्च / एप्रिल २०२४ व ऑक्टोबर २०२४ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
सुंदरराव सोळंके महाविद्यालयात घेण्यात आलेल्या दीक्षांत सोहळ्यात प्रमाणपत्राचे वाटप प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. के. सानप होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.एन. के.मुळे, उपप्राचार्य डॉ.एम. ए.कव्हळे, भाषा विषयाचे प्रमुख डॉ.के. बी. गंगणे, विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.प्रविण देशपांडे,सामाजिकशास्त्र प्रमुख डॉ. अरुण पेंटावार, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सचिन रुद्रवार अधिक्षक सतीश एरंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सूचनेनुसार २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ महाविद्यालय स्तरावर घेण्यात आला. यावेळी बी. ए. ,बी.एस्सी, बी. कॉम, बी.सी.ए., बी.सी.एस. व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.