Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादसण, उत्सवात ध्वनीची मर्यादा राखून सूट दिल्याचे आदेश जारी

सण, उत्सवात ध्वनीची मर्यादा राखून सूट दिल्याचे आदेश जारी

सण, उत्सवात ध्वनीची मर्यादा राखून सूट दिल्याचे आदेश जारी

जालना :- जिल्ह्यात सन 2025 मध्ये विविध धार्मिक सण, उत्सव व उपक्रम संपन्न होणार असून या सण, उत्सवाच्या काळात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर शासन निर्णय व ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) नियम 200 च्या नियम 5 (3) नूसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर श्रोतेगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागेशिवाय इतर ठिकाणी ध्वनीची विहीत मर्यादा राखून चालु वर्षातील खालील सण / उत्सव व उपक्रमाच्या दिवशी  सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

सण, उत्सव व उपक्रमामध्ये शिवजयंती, ईद-ए-मिलाद, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी (दि. 15.08.2025) अनुक्रमे एक दिवस तर गणपती उत्सवासाठी दि. 27 ऑगस्ट व 6 सप्टेंबर रोजीचे 2 दिवस तसेच नवरात्री उत्सवातील नवमी आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन, ख्रिसमस, 31 डिसेंबर रोजी, विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा दि.14 व 15 फेब्रुवारी रोजी  आणि महत्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव दोन दिवस अशी सुट जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सण, उत्सवासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतची सुट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका, नगर पंचायत, स्थानिक संस्था व ध्वनी प्रदुषण प्राधिकरणाची राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments