सुलीभंजन परिसरात वन विभागाचे जंगलात अनोळखी व्यक्तीचे मृत्यूदेह सापडल्याने खळबळ
सुलीभंजन दत्ता मंदिर परिसरात वन विभागाचे जंगलात धक्कादायक घटना; जंगलात आढळला पुरुष व्यक्तीच्या कुजलेला मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सुलीभंजन येथील दत्ता मंदिर परिसरातील वन विभागाच्या डोंगराळ भागात एका इसमाचा झाडाला लटकलेला मृतदेह.
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील- सुलीभंजन येथील दत्ता मंदिर परिसरातील वन विभागाचे गट नंबर 62 डोंगराळ भागात एका अनोळखी इसमाचा प्रेत हा शेळ्या चरणाऱ्या झाडाला लटकलेला आमेर शहा हमीद शहा यांना झाडास लटकलेला पुरुष जातीचे
मृतदेह आढळून मंगळवारी. तात्काळ सुलीभंजन तंटामुक्तीचे अध्यक्ष माजिद अली यांना या घटनांची माहिती दिली. माजिद अली यांनी लगेच मोबाईल द्वारे बीड जमादार शेख जाकीर यांना या घटना संदर्भात सविस्तर माहिती दिली मिळताच घटनाची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक राजेश पाटील बीड जमादार शेख जाकीर यांनी घटनास्थळांच्या पंचनामा करून. मृतदेह शवविच्छेदन साठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनांची तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश पाटील व बीट जमादार शेख जाकीर हे करत आहे. मात्रा या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदरील मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुमारे आठ दिवसांपूर्वी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.या घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.सहायक पोलीस निरीक्षक राजेश पाटील व बीट जमादार शेख जाकीर हे घटनास्थळी पंचनामा केला असुन पुढील तपास सुरू आहे.दरम्यान,हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या,याबाबत परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
