सुखापूरी येथे शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने नेत्रदान शिबीर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेत्र तपासणी १०५ रुग्णांची केली
मोतीबिंदू शस्त्रक्रिया २३ रुग्णावर करणार
जालना/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील सुखापूरी येथील उपविभागीय आरोग्य केंद्रात आज शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान,लॉयन्स नेत्र रुग्णालय,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद,जालना व प्राथमिक आरोग्य केंद्र,सुखापुरी,शांताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले नेत्रदान शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले.या शिबिरात नेत्र तपासणी १०५ नागरिकांनी केली.त्यात २३ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार असून डोळ्याच्या गंभीर आजाराचे १८ रुग्ण आढळून आले.
या शिबिरात परिसरातील नागरिकांनी महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून डोळे तपासणी करून घेतल्याचे दिसून आले.
या नेत्रदान शिबिराचे उद्घाटन सुखापूरीचे सरपंच भगवानराव राखुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती राईस बागवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास आरोग्य विभागातील डॉक्टर,नर्स व कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगले सहकार्य केले.
छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शिबिरात विशेष योगदान दिले.या पथकामध्ये डॉ.शामली जाधव (ऑप्टोमेट्रिस्ट),डॉ.सचिन आढे (कॅम्प को-ऑर्डिनेटर),डॉ.गौतम एकाडे (टेक्नीशियन) आणि डॉ.अविनाश सोनवणे (टेक्नीशियन) यांचा समावेश होता.त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी व नेत्रदान प्रक्रियेचे काम सुरळीतपणे पार पडले.
या शिबिरास अंबड खरेदी-विक्री संघाचे संचालक,भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,ऊस उत्पादक शेतकरी,परिसरातील पत्रकार,ज्येष्ठ नागरिक,तरुण वर्ग तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.नेत्रदानाचे महत्त्व समजून घेऊन नागरिकांनी दाखविलेला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे खास प्रमुख अतिथी म्हणून समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीष घाटगे व व्हाइस चेअरमन महेंद्र मेठी उपस्थित होते.त्यांनी शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याबाबत जागृती निर्माण होते,असे प्रतिपादन केले.
हा संपूर्ण कार्यक्रम राजू छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी शिंदे,परमेश्वर शिंदे,योगेश गायकवाड,गोकुळ राखुंडे,देवा खंडागळे,अमीर सय्यद,नवनाथ उंडे,सुनील गायकवाड,अंगद मिरदुडे,विठ्ठल लगड,शकील भाई,अजय मासुले,रोहन कोटंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.