दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमा पवार यांचे चरई खुर्द येथे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत
प्रबोधनकार सुषमा पवार यांचे कलाम सुत्त या विषयावर चरई खुर्द येथील नालंदा बुद्धविहारात चौदावे विचार पुष्प संपन
बोरघर/माणगाव/ दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा तळा व बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा व उपशाखा तळा यांच्या संयुक्त विद्यमाने मु.चरईखुर्द नालंदा बुद्धविहार ता.तळा या ठिकाणी वार रविवार २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ :३० वाजता वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या चौदाव्या पुष्पाचे सुंदर असे आयोजन सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व बौध्दजन सेवा संघ स्थानिक व मुंबई मंडळ व महामाता यशोधरा महिला मंडळ चरईखुर्द ता.तळा यांच्या सहकार्याने गुंफण्यात आले. या निमीत्ताने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमा पवार यांची वर्षावास धम्मप्रवचनासाठी प्रवचनकार म्हणून प्रामुख्याने उपस्थिती लाभली. ढोल वादन, फटाके व पुष्पवर्षाव करून सुषमा पवार यांचे जंगी स्वागत चरईखुर्द ग्रामस्थ व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व बौद्धजन पंचायत समिती या दोन्ही संस्थेच्यावतीने करण्यात आले, या स्वागताने सुषमा पवार भारावून गेल्या,त्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले.
या प्रसंगी तळा तालुका संरक्षण उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे जवान मनोहर शिंदे, विश्वजित नाक्ते,श्रेया नाक्ते यांनी सुषमा पवार यांना मानवंदना दिली. वर्षावास धम्मप्रवचनाचे सुत्रपठण तळा तालुका संस्कार प्रमुख नरेश मोरे यांनी केले. तद्नंतर आलेल्या मान्यवरांचे चरई ग्रामस्थानी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले,कार्यक्रमाच्या प्रसंगी तळा तालुका भारतीय बौध्दमहासभा प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र शेलार यांनी प्रास्ताविका केली.धम्म संस्थेने ठरवून दिलेला विषय कालाम सुत्त या विषयावर सुषमा पवार यांनी धम्मप्रवचन दिले.परंपरा,रूढी किंवा अंधश्रद्धा यावर न चालता विचार करून,तपासून सत्य स्वीकारावे, चांगल्या वाईटाची शहानिशा करताना विवेक,करूणा आणि प्रज्ञा यांचा आधार घ्यावा.बुद्धांचा हा संदेश आजच्या वैज्ञानिक आणि तर्कप्रधान युगात अधिकच आवश्यक आहे अशी अनेक उदाहरणे देऊन विषय समजावून सांगितला.
या प्रसंगी भारतीय बौद्धमहासभा रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिता जाधव,रायगड जिल्हा संस्कार प्रमुख नितीन मोरे, संस्कार सचिव सुभाष ओव्हाळ,रायगड जिल्हा संघटक सुर्यकांत तांबे, संघटक कोमल गायकवाड,माणगाव तालुका अध्यक्ष प्रबुद्ध जाधव,संघटक अश्विनी साळवी आदी मान्यवर पदाधिकारी यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे तळा तालुका भारतीय बौद्धमहासभा अध्यक्ष रामदास शिंदे आणि संपूर्ण कार्यकारिणी,तळा तालुका भारतीय बौद्धमहासभा महिला अध्यक्षा सुषमा शिंदे व कार्यकारिणी,बौद्धजन पंचायत समिती तळा तालुका सरचिटणीस सचिन गवाणे,उपाध्यक्ष महादेव जाधव,शाखा क्र.४ चे अध्यक्ष संदेश पवार, तसेच बहुसंख्येने धम्म उपासक उपासिका उपस्थित होते.
या वर्षावास प्रवचनमालिकेची संपूर्ण जबाबदारी बौध्दजन सेवा संघ चरई खुर्द स्थानिक व मुंबई मंडळ आणि महामाता यशोधरा महिला मंडळ यांनी पार पाडली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयेश शिंदे आणि आदित्य शिंदे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन रामदास शिंदे यांनी केले व अध्यक्षीय भाषण सुनील शिंदे यांनी केले व भोजनदानानंतर कार्यक्रम समाप्त झाला, या कार्यक्रमाने रायगड जिल्ह्यात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असे समाजातून बोलले जात आहे.