Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादएसटी डेपो नांदेड आगाराचे आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांची नागपूर येथे बदली

एसटी डेपो नांदेड आगाराचे आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांची नागपूर येथे बदली

एसटी डेपो नांदेड आगाराचे आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांची नागपूर येथे बदली
कामगार-कर्मचाऱ्यांकडून सत्कार व निरोप
नांदेड/  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथील विद्यमान आगार व्यवस्थापक मा.श्री.अनीकेत बल्लाळ यांची एसटी महामंडळ आस्थापनाने सेंट्रल वर्कशॉप हिंगनारोड कार्यशाळा नागपूर येथे उपअधीक्षक या पदावर निवड करून बढती देवून बदली केल्यामुळे दि.11 जुलै 2025 शुक्रवार रोजी एसटी डेपो नांदेड आगारातील कामगार-कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा आराध्यदैवत विठ्ठल-रूक्माईची प्रतिमा, शाल, श्रीफळ, भेट वस्तू व पूष्पहार देवून एसटी नांदेड विभागाचे विभागीय वाहतुक अधिक्षक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे यांच्या हस्ते ह्दय सत्कार व अभिनंदन करून शुभेच्छा रूपी निरोप देण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय वाहतूक अधिक्षक मिलींदकुमार सोनाळे, कार्यशाळा अधिक्षक विष्णू हारकळ, श्रीनिवास रेणके, वाहतुक निरीक्षक शेख मोबीन, सत्कारमूर्ती आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, पाळी प्रमुख कैलास वाघमारे, संजय खेडकर, संभाजी जोगदंड, गिरीष कुलकर्णी, छायाचित्रकार मंगेश कांबळे, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, वैशाली कोकने, सुनिता हुबे, मयूर गायकी, देविदास महाजन, विजय सुर्यतळे, बाबासाहेब चिंतोरे, गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, मला संपूर्ण आगारातील कामगार-कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून भरपूर सहकार्य केल्यामुळे मी या आगाराचे नेतृत्व व्यवस्थीतरित्या पार पाडू शकलो, याचा मला सार्थ अभिमान असून आपण सर्वांनीच माझा सत्कार करून भरभरून प्रेम दिल्यामुळे मी आपल्या सर्वांचेच आभार मानतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी करून ते आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले की, श्री अनिकेत बल्लाळ यांनी प्रवासी सेवेमध्ये काम करीत असतांना कामगार-कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी, प्रश्न जाणून व समजून घेवून ते सोडवण्याचा प्रयत्न केला व समन्वय ठेवला, असे प्रतिपादन करून त्यांना भावी आयुष्यासाठी व प्रवासी सेवेमधील कार्यासाठी सर्वांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. शेवटी पाळी प्रमुख कैलास वाघमारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली. याप्रसंगी एसटी आगारातील कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments