एस टी कॉलनीत हनुमान जयंती उत्साहात. हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ; श्री महारुद्र हनुमान मंदिर समितीचे आयोजन

0
55

एस टी कॉलनीत हनुमान जयंती उत्साहात. हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ; श्री महारुद्र हनुमान मंदिर समितीचे आयोजन

छत्रपती संभाजी नगर :- एन-सिडको येथील एसटी कॉलनीमध्ये भव्य हनुमान जन्मोत्सव श्री महारुद्र हनुमान मंदिर समितीच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते श्री हनुमानाची आरती करून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील हजारो महिला, पुरुष, लहान मुले, तरुण तरुणींनी घेतला.

श्री महारुद्र हनुमान मंदिर समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हनुमान मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या महाप्रसादाच्या आयोजनासाठी एस टी कॉलनी सोसायटीचे अध्यक्ष देवनाथ जाधव, सचिव अशोक नवपुते,सहसचिव राजकुमार बनसोड, कोषाध्यक्ष गोरख हुंबे, सोसायटी सदस्य रमाकांत निकम, रामचंद्र नवपुते, शंकर नाचण, रंगनाथ कांबळे, संतोष गाढेकर, राजेंद्र अंभूरे,  काकासाहेब पवार, विठ्ठल आगलावे, श्री भागवत भारती, ज्ञानेश्वर दाढाळे, संतोष गाढेकर, राजकुमार बनसोड, श्री.नाईक, श्री.शहा, कचरू वीर, प्रमोद महेंद्र, खानापुरे अप्पा, अमित बेद्रे, भीमराव डोळस, सुनील निकम, रविराज जैतमल तसेच एसटी कॉलनीतील सर्व सभासदांनी पुढाकार घेतला.