Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादएसटीच्या वर्धापन दिनानिमित्त वाहक बद्रीनाथ भालगडे सन्मानित

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त वाहक बद्रीनाथ भालगडे सन्मानित

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त वाहक बद्रीनाथ भालगडे सन्मानित

सिल्लोड/प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणजेच आपली सर्वांची लाल परी या लालपरीचा 77 वाढदिवस  एक जून रोजी मुंबईमधील यशवंत नाट्यमंदिरात नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक होते तर महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, संजय सेठी अप्पर मुख्य सचिव परिवहन यांची प्रमुख उपस्थिती होती .या कार्यक्रमाच्या वेळी परिवहन मंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांचा लोकार्पण सोहळा तसेच गुणगौरव सोहळा संपन्न झाला ,या कार्यक्रमांमध्ये राज्य परिवहन महामंडळातील सिल्लोड आगारांमध्ये वाहक पदावर कार्यरत असणारे कवी बद्रीनाथ शिवनाथ भालगडे यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर  व इतर मान्यवरांच्या हस्ते भालगडे यांना सन्मानित करण्यात आले भालगडेंच्या या सन्मानाबद्दल विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर तसेच आगारप्रमुख विजय काळवणे, आगारप्रमुख (औसा) शंकर स्वामी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments