सोयगाव येथील शेतकरी पुत्र डॉ.मोहित जोहरे यांच्या टीम ची कामगिरी 

0
89
सोयगाव येथील शेतकरी पुत्र डॉ.मोहित जोहरे यांच्या टीम ची कामगिरी 
राज्यात सर्वाधिक प्रसूती करणारे शेंदुर्णी प्रा. आरोग्य केंद्र ठरले दुसरे..शासनाचा पुरस्कार जाहीर
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ प्रतिनिधी/राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिनस्त संस्था यांना जागतिक आरोग्य दिन निमित्ताने ७ एप्रिल, २०२५ रोजी श्री. यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे राज्याचे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य, मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मा. राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवून त्यामध्ये पुरस्कार देण्यात आला आहे.
सदरील कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य विभागातील उत्तम कामगिरी करणारे जिल्हे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, कुटुंब नियोजन कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणारे रुग्णालय, जास्त प्रसूती करणारे आरोग्य संस्था, आरबीएसके पथकातील उत्तम कामगिरी जिल्हा, असंसर्गजन्य आजारांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, सिकल सेलमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, उत्तम कामगिरी करणारे SNCU, उत्तम कामगिरी करणारे ICU, तसेच गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.
सोयगाव येथील शेतकरी पुत्र व शेंदुर्णी डॉ.मोहित जोहरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनी रात्रंदिवस परिश्रम घेत ४४५ प्रसूती केल्या. या मेहनतीला यश येत द्वितीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून सोयगावसह शेंदुर्णी असे सर्वत्र कौतुक होत आहे.
माझे वडील इ.स. १९९१ मध्ये बीड जिल्ह्यात नोकरी निमित्त गेले असता त्या वेळी  मी एक वर्षाचा असतांना, बालपणी आई ने ब्युटी पार्लर क्लासेस आणि वडिलांनी बीड सारख्या अवघड ठिकाणी  फार मेहनतीने व कष्ट करून मला , आणि माझ्या बहिणीच्या शैक्षणासाठी कष्ट घेत मला एमबीबीएस साठी नंबर लावून दिला.दरम्यान वडिलांची तब्येत २००९ मध्ये फार खालावली तरी सुद्धा आईने मोठ्या हिंमतीने शैक्षणिक क्लासेस सुरू ठेवून माझे व बहिणीचे शिक्षण केले. या काळात आई ला बीड जिल्ह्यात आदर्श माता पुरस्कार सुध्दा मिळाला तसेच बेस्ट ब्युटीशियन अवार्ड देखील मिळाला.. आई-वडिलांनी मला कधीच कोणतेही व्यसन न करण्याचे संस्कार दिले . माझा आध्यात्मिकतेकडे कल होता परंतु आई-वडिलांनी सांगितले की शिक्षण करून अध्यात्म सांभाळावे. २०१७ मध्ये माझे दिपाली सोबत लग्न झाले दिपाली बी एम एस शिक्षण झालेली आम्ही दोघांनी सोयगाव शहरामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता परंतु माझ्या आई-वडिलांची इच्छा होती की आम्हाला  गावासाठी काही करता आलं नाही तू तरी आपल्या भागातील लोकांना सेवा दे म्हणून मी सुरुवातीला गावातच छोटे खणी दवाखाना उघडून आणि नंतर पिंपळगाव हरेश्वर आणि नंतर शेंदुर्णीला सरकारी दवाखान्यामध्ये सेवा द्यायला सुरुवात केली
आज ही मी  व सर्व कुटुंब शेतामध्ये जातो. गावामध्ये सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून वागतो कारण आम्हाला आमच्या वडिलांनी हे संस्कार दिले की पैसा सर्व काही नसतो जो माणूस पैशांपेक्षा माणसं जोडतो तो माणूस कधीही सर्वात श्रीमंत सोयगाव मधील गावातील सर्व लोकांनी मला फार प्रेम दिले आजही मला कधी शहरात राहत नसल्याचा आभाव वाटत नाही.. शेंदुर्णी मध्ये सेवा देत असताना मला सुरुवातीला फार अडचणी यायला लागल्या परंतु नंतर कामाची सवय होत गेली इतकी मोठी लोकसंख्या सांभाळणं एका दोघा डॉक्टरांचे काम नाही पण सर्व लोकांचे सहकार्य आणि शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राला आतापर्यंत जिल्ह्यामध्ये स्थान होतं आता राज्यामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी सर्व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय वैद्यकीय अधिकारी ,औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका , परिचारिका, आरोग्य सेवक ,आरोग्यसेविका , गटप्रवर्तक,आशा सेविका परिचारक ,परिचारिका अशा सगळ्यांनी मिळून जो परिवार तयार होत गेला त्या परिवारा कडून मला भरपूर शिकायला भेटलं… काम करणाऱ्यांपेक्षा काम करून घेणारे हे महत्त्वाचे असतात असे शेंदुर्णी येथील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नामवंत व्यक्तींनी नेहमी मला साथ दिली आणि आज प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यात प्रसुतीमध्ये दुसरे आले आहे
-डॉ. मोहित जोहरे