Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादसोयगाव शेंदूरणी रस्ता तात्काळ सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा — भाजपा...

सोयगाव शेंदूरणी रस्ता तात्काळ सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा — भाजपा जिल्हा चिटणीस सुनील गावंडे

सोयगाव शेंदूरणी रस्ता तात्काळ सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा — भाजपा जिल्हा चिटणीस सुनील गावंडे
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/  अनेक वर्षांपासून सोयगाव–शेंदूरणी हा महत्वाचा मार्ग अक्षरशः खड्यांमध्ये हरवला आहे. मराठवाडा आणि खानदेशाला जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, रस्ता ओळखूही न येण्याजोगा झाला आहे. या रस्त्यावर दररोज दुर्घटना घडत असून, आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा चिटणीस सुनील गावंडे यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, “सोयगाव–शेंदूरणी रस्त्याचे काम तातडीने सुरू न केल्यास भाजपकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
गावंडे यांनी पुढे सांगितले की, “हाच रस्ता मराठवाडा आणि खानदेश या दोन प्रदेशांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या जोडणारा कणा आहे. त्यामुळे हा रस्ता सुरू करणे केवळ विकासाचा प्रश्न नाही, तर जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.” त्यांनी सोबतच सोयगाव–पलासखेडा रस्ता व सोयगाव–शेंदूरणी मार्गाचे कामही एकाचवेळी सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments