सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात
सावळदबारा/प्रतिनिधी/ शनिवार रोजी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ घोषणा देत व ढोलताशांच्या गजरात श्रींच्या मूर्तीची मिरवणूक सावळदबारा गावातून काढण्यात आली होती. मिरवणुकीसमोर भाविक भक्तांनी ठिकठिकाणी चौकाचौकांत लेझीम खेळत होते. घराघरासमोर रांगोळी काढली होती. शनिवारी दुपारी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती. सावळदबारा येथील जवळच्या तलाव येथे गणरायाचे विसर्जन पार पडले, यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते, सखाराम कोते, दिनकर शिपलकर, वासुदेव खडके, पंढरी सपाटे, एकनाथ सपाटे, प्रमोद काळे, राजू गलबले,
