देगलूर/प्रतिनिधी/ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येरगी येथे सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी भव्य मोफत नेत्र रोग तपासणी , मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि हायड्रोसिल,अपेंडिक्स, हर्णिया यांचे मोफत शस्त्रक्रिया होणार असून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
येरगी येथील संतोष पाटील मित्र मंडळ तर्फे आयोजित या शिबिराचे उद्घाटन राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे हे राहणार असून मराठवाडा संघटन मंत्री सजुभाऊ कौडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष सतुक हाबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदरील शिबिरात नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येईल तसेच ज्या नागरिकांना मोतीबिंदू असेल अशा रुग्णांची उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. आयोजकांनी सांगितले आहे की शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची जाण्या येण्याची सुविधा तसेच रुग्णांच्या राहण्याची जेवणाची आणि काळा चष्मा ची सोय मोफत करण्यात येईल यासाठी रुग्णांकडे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड चे झेरॉक्स प्रत व आपल्या जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर असणे अनिवार्य आहे. मोतीबिंदू व्यतिरिक्त डोळ्याच्या अन्य काही शस्त्रक्रिया असल्यास उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय यांच्यातर्फे त्या अत्यंत अल्प दरात केल्या जातील.
उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीरचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध नेत्र विशेषज्ञ डॉ. रामप्रसाद लखोटिया हे येणार असून त्यांच्या समवेत डॉ. सुदाम बिरादार,डॉ. शितल पैदावाड,डॉ. सागर समगे डॉ. सुरज लवटे हे डॉक्टर्स येणार आहेत.
याबरोबरच या भव्य मोफत आरोग्य शिबिरात अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल या आजाराच्या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करण्यात येणार आहेत याचबरोबर या शिबिरात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्त संकलन करण्यासाठी गोळवलकर गुरुजी ब्लड बँक नांदेड यांची सेवा लावणार आहे सदरील शिबिरात इतर आजारावर सुद्धा मोफत सल्ला व उपचार होणार आहेत.
सदरील भव्य मोफत आरोग्य शिबिरात उपजिल्हा रुग्णालय देगलूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवनीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश गवाले,प्रसिद्ध सर्जन डॉ. विनायक मुंडे, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. शोभा भूमे, हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. निवृत्ती तेलंग, अस्थिरोग तज्ञ डॉ. अमित देगलूरकर, बालरोगतज्ञ डॉ. संतोष चिंतलवार ,मरखेल चे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता चामले, देगलूर येथील जनरल फिजिशियन डॉ. शिवकार्तिक स्वामी हे उपस्थित राहून आपली सेवा देणार आहेत.
सदरील शिबिरात येताना नागरिकांनी आवश्यक असणारी कागदपत्रे, त्यांचा मागचा रिपोर्ट ,आधार कार्ड व मतदान कार्ड यांचे झेरॉक्स घेऊन येण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.
सदरील शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संतोष पाटील आणि संतोष पाटील मित्र मंडळ येरगी यांनी केले आहे.