Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादसोयगाव शहराला अवैध धंद्याचा विळखापोलीस निरीक्षक पंकज बारवाल निष्क्रिय नगर

सोयगाव शहराला अवैध धंद्याचा विळखापोलीस निरीक्षक पंकज बारवाल निष्क्रिय नगर

सोयगाव शहराला अवैध धंद्याचा विळखापोलीस निरीक्षक पंकज बारवाल निष्क्रिय नगर
सेवकांचा आरोप;-थेट पोलीस अधीक्षक यांची घेतली भेट
फोटो ओळ-पोलिस अधीक्षक विनायकुमार राठोड यांना निवेदन देतांना गटनेते अक्षय काळे, हर्षल काळे हर्षल देशमुख कुणाल राजपूत व इतर…
सोयगाव,ता.३०;-सोयगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंद्यानी विळखा घातला असून शहरातील अवैध धंदे तातडीने बंद करावे यासाठी सोयगाव नगर पंचायतच्या सर्व नगर सेवकांनी शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी पाच वाजता थेट पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांची भेट घेऊन शहरातील व ग्रामीण भागातील अवैध धंद्याची कैफियत मांडून हे धंदे त्वरित बंद करण्याची मागणी साठी निवेदन दिले आहे
सोयगाव शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्या मुळे शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे सोयगाव सह तालुक्यातील अवैध धंद्याची माहिती सोयगाव पोलिसांना असूनही पोलीस निरीक्षक काना डोळा करतात त्यामुळे शहरातील व तालुक्यातील वातावरण खराब झाले असून यासाठी पोलिस निरीक्षक पंकज बारवाल हे जबाबदार आहे शहरातील व तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व अवैध धंद्या ची माहिती पोलिसांना असूनही ते काना डोळा करतात,शहरात जुगार,ग्रामीण भागात अवैध दारू या धंद्यानी तालुका बरबटलेला आहे त्यामुळे महिला वैतागून गेल्या असून घरात कौटुंबिक वाद सुरू झाले आहे घोरकुंड गावात चक्क संतप्त महिलांनी दारू बंद करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते तसेच घोरकुंड गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत अवैध दारू विक्रेत्यांनी लपवून ठेवलेली दारुच्या बाटल्या एका विद्यार्थीनीने काढून दिल्या तरीही अद्याप या गावात एकही कारवाई झाली नाही यावरून पोलिसांची निष्क्रियता दिसून येते असा आरोप पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे निवेदनावर नगरपंचायत गटनेते अक्षय काळे,उपजिल्हाप्रमुख प्रभाकर( आबा) काळे,
नगराध्यक्ष आशाबी तडवी,उपनगराध्यक्ष सुरेखा  काळे,शेख शाहीस्ताबी रऊफ,हर्षल काळे,संध्या मापारी
कुसुम दुतोंडे,संतोष  बोडखे,भगवान जोहरे,गजानन कुडके, वर्षा घनघाव, ममताबाई इंगळे, आशीयाना शहा, अशोक खेडकर, लतीफ शहा आदी नगर सेवक व कंकराळा येथील कुणाल  राजपुत (युवासेना ता.म) स
फिरोज उसमान खा.. पठाण
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments