Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादसोलह कारण ऊपवास करणाऱ्या तपस्वींची पारणा संपन्न

सोलह कारण ऊपवास करणाऱ्या तपस्वींची पारणा संपन्न

सोलह कारण ऊपवास करणाऱ्या तपस्वींची पारणा संपन्न
छत्रपती सभाजीनगर /  उपाध्याय श्री विरंजन सागर जी महाराज यांनी आज श्री १००८ भगवान मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर, देशमुख नगर येथे सर्व तपस्वींची पारणा केला. आज सकाळी चार तपस्वींनी १६ दिवसांची कठोर तपस्या पूर्ण केली – विनीत लोहाडे, ज्योती शीतल काला, तनुजा शिखरचंद ठोळे आणि सुमन जैन प्रेमचंद जैन ढोळे. या सर्वांनी साधना केली आणि आज सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये तपस्वींना बग्ग्यांवर बसवून  नगरभ्रमण घडविण्यात आले. देशमुख नगर कमिटीने त्यांचे भव्य स्वागत व सन्मान केला.
मंचावर गुरुदेव याचा पादप्रक्षालन तनुजा शिखरचंद ढोळे परिवाराने केला तसेच शास्त्र भेट चुडीवाल परिवाराने केली. या प्रसंगी खंडेलवाल समाजाचे   समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना मुनिश्री म्हणाले – “सोलह कारण भावना केल्याने तीर्थंकर प्रकृतीचे बंध होते, आणि जे तप, त्याग, तपस्या करतात ते अनंत कर्मांची निर्जरा करून स्वर्गाची प्राप्ती करतात. पंचम कालात हीन सहनशीलता असूनही श्रावक साधना करतात, तप करतात आणि तपाच्या माध्यमातून संयमाच्या मार्गावर पुढे जातात. प्रत्येकाने एक लक्ष्य ठरवणे आवश्यक आहे. मंजिल गाठायची असेल तर भगवान होण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करावे लागते, आणि त्या पायऱ्यांवर चालूनच भगवान होऊ शकतो.”
मुनिश्री पुढे म्हणाले – “नवीन गुण, नवीन रंगत आणि नवे अरमान निर्माण करा. या मातीच्या पुतळ्यात भगवानाला जन्म द्या.  त्याग आणि तपस्येमुळे मन संतुलित होते, इंद्रिये वशात राहतात आणि आपले विचार व भावना निर्मळ होतात.”
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments