संविधावादी कामगार संघटना परिसंवाद
रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सेना सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने संविधावादी कामगार संघटना सोबत घेऊन सध्या निर्माण झालेला प्रश्न 8 तासावरून 12 तास करणेत आला त्यामुळे कामगारांवर कामाचा अतिरिक्त भार पडून मानसिक संतूलन बिघडून आरोग्य धोक्यात येऊ शकतो म्हणून कामगारांच्या अनेक समस्यांचे पश्न परिसंवाद बैठक ठेवण्यात आली.परिसंवाद बैठकीचे अध्यक्ष रि.का.सेना महा.राज्य अध्यक्ष मा.युवराज दादा बनसोडे हे होते.तर स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.सागर भाऊ तायडे परिसंवाद बैठकीचे प्रमुख वक्ते होते त्यानी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कामगारांच्या विविध समस्या आणि कामगारांचे हक्क अधिकार,न्याय कसा मिळवता येतो.ते कामगारांनी प्रथम समजून घेतले पाहिजे ही सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भिम कॉलनी ओटी चौक उल्हासनगर ४ येथे परिसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा कामगार नेते सागर तायडे यांनी मार्गदर्शन केले.
बाबासाहेबांनी लाचारीची भाकरी खाण्यापेक्षा स्वाभिमानची भाकरी खाण्यासाठी “खेडे सोडा शहर गाठा” असे सांगितले म्हणून आज मुंबई सारख्या शहरात बांधकाम धंद्यातील नाका कामगार,घर कामगार, सुरक्षा राक्षक, फेरीवाले,झाडूवाले कचरा वेचणारे असे ९३ असंघटित कामगार आहेत. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाल्या नंतर मुंबईतील झाडूवाल्या सफाई कामगारांची पहिली संघटना १९३४ काढली होती.ती देशातील आदर्श ट्रेड युनियन म्हणून १९४१ ला ब्रिटिश सरकारने सन्मान पत्र दिले होते.ती कामगार संघटना आज मुंबई सोडून कुठे ही नाही. १२/१३ फेब्रुवारी १९३८ साली मनमाडला अंगठे बाहदूर रेल्वे गँगमन कामगारांची दोन दिवशीय परिषद घेतली होती.तेव्हा बाबासाहेबांनी कामगारांना सांगितले होते की कामगारांचे दोन दुश्मन आहेत.एक भांडवलशाही दुसरी ब्राम्हणशाही त्यांना संपविण्यासाठी कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी स्वताच्या संघटना काढून त्या स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न केल्या पाहिजेत.ते जयजयकार करणाऱ्या कामगार कर्मचारी अधिकारी यांनी ऐकले नाही. ते घरी आले की कट्टर जयभीम वाले बौद्ध असतात आणि कामावर मनुवादी विचाराच्या संघटनेचे सभासद असतात. म्हणूनच २०१४ पासून भांडवलशाही ब्राम्हणशाही हातात हात घालून कष्टकरी असंघटित मागासवर्गीय बहुजन कामगार कर्मचारी अधिकारी यांचे बळी घेत आहेत. त्यातील ही आठ तासाचे बारा तासाचा जी आर आहे.त्याला विरोध करणारे आंबेडकरी विचारधारेच्या कार्यकर्त्या शिवाय कोणी जास्त प्रमाणात रस्त्यावर उतरतांना दिसत नाही.असे अनेक उदाहरण कामगार नेते सागर तायडे यांनी दिले.
भीम कॉलनी सारख्या वस्ती मध्ये त्यासाठी वेळोवेळी परिसंवाद बैठकी घडवून आणल्या पाहिजेत त्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्क अधिकाराच्या कायद्याची तरतूदीची माहिती होईल असे स्वतंत्र मजदूर युनियन चे राज्याध्यक्ष सागर तायडे यांनी सांगितले.तसेच बैठकीत उपस्थित मान्यवरांनी ही कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कसे काम केले पाहिजे ही पटवून दिले.त्याच बरोबर रिपब्लिकन कामगार सेना उपाध्यक्ष मा.अरविंद पाण्डेय यांनी कामगार व कार्यकर्ते यांनी प्रोटोकॉल नुसार पालन करणे गरजेचे आहे त्यामुळे समस्यांचा निपटारा करता येतो व शिस्त पालनाची सवय लागते मा.सुहासजी बनसोडे रि.का.सेना महा.राज्य सचिव यांनी आपल्या मार्गदर्शनात त्यांनी कामगारांचे जे प्रश्न परिसंवाद बैठकीत मांडले आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहे त्यावर उपयोजना काढून सरकार कडे पाठ पुरावा करायला हवा त्याच बरोबर त्यांनी आयोजक व संयोजक यांचे आभार मानले.
अध्यक्षीय परिसंवादात मा.युवराज दादा बनसोडे जी यांनी आपल्याला मार्गदर्शनात कामगारांच्या गंभीर समस्या तर आहेतच परंतु त्या सोडवण्यासाठी संविधानवादी कामगार संघटनेने एकत्रित येऊन कार्य केले पाहिजे त्या साठी कामगार सेनेच्या पदाधिकारी,कार्यकर्ते आणि कामगार सदस्यांनी खांद्याला खांदा लाऊन कार्य करायला हवे तेव्हाच कामगारांना स्वतंत्र,समानता,हक्क अधिकार,न्याय मिळेल हे सांगत असताना कार्यक्रमचे संयोजक आयु.विक्रम भाई खरे आयोजक हनुमंत वाघमारे,आयु. बाळकृष्ण शिंदे यांचे कौतुक करून हार्दिक सदिच्छा दिल्या.
परिसंवाद बैठकीत उपस्थित मान्यवर मा.युवराज दादा बनसोडेजी अध्यक्ष रिपब्लिकन कामगार सेना,मा.सागर तायडेजी अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य,रिपब्लिकन कामगार सेना उपाध्यक्ष मा.अरविंद पाण्डेजी, रिपब्लिकन कामगार सेना महा.राज्य मा.सुहासजी बनसोडे रि.प.का.सेना महा.राज्य सचिव कविवर्य मा.राजरत्न राजगुरू जी महा.सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक समशुद्दीन भाई मन्सुरी रि.का.से.नेता,आयु. शैलेंद्र पवार रि.प.से.ठाणे जिल्हा सचिव आयु.साभाष उघडे रि.प.से.ठाणे जिल्हा सचिव प्रविण मिर्के कार्यकारी उपाध्यक्ष रि.प.से.ठाणे जिल्हा ॲड.किरण जाधव रि.प.से,युवा अध्यक्ष ठाणे जिल्हा आयुनि.मायाताई कांबळे रि.प.से.ठाणे जिल्हा प्रभारी आयु.श्रीरंग कनकुटे रि.प.से.ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,आयु.अनंत पार्दुले रि.प.से.क.डो.ग्रामीण अध्यक्ष एपीएमसी मार्केट युनिट अध्यक्ष,आयु.ॲड.महेंद्र निकम रि.प.से उ.श.अध्यक्ष,आयु.दिपक आहिरे रि.प.से.युवा अध्यक्ष,आयु.किशोर निकम रि.प.से.उ.श.उपाध्यक्ष,आयु.प्रकाश चंदनशिवे रि.प.से.उ.श. उपाध्यक्ष,आय.प्रफुल साळवे रि.प.से.क.डो.श.युवा अध्यक्ष,आयु.कैलास निकम रि.प.से.उ.(3) विभाग अध्यक्ष,आयु.सुनील भालेराव रि.प.से.उ.(4) विभाग अध्यक्ष,आयु.गुल मोहम्मद शेख टेक्सटाईल मार्केट उ.(2) कार्यक्रमाचे संयोजक आयु.विक्रम भाई खरे महा.राज्य समन्वयक,आयोजक आयु.हनुमंत वाघमारे रि.का.से.उ.श.अध्यक्ष / आयु.बाळकृष्ण शिंदे रि.प.से.उल्हासनगर शहर उपाध्यक्ष निमंत्रक आयु.रामा लिंबाजी गायकवाड,भागवत भालेराव,आयु दिनेश घाणेकर,दिपक पायाळ,विकास साळवे, स्थानिक महिला वर्ग उपस्थित होते अनेक मान्यवरांचा सत्कार आणि पक्ष प्रवेश करण्यात आला
“कामगारांच्या सन्मानात रिपब्लिकन सेना मैदानात”
“जोर जुल्म के टक्कर में संघर्ष यही हमारा नारा है “