Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसिपोरा अंभोरा जिल्हा परिषद गणातून भारतीय जनता पार्टीकडून सौ.रमा मधुकर दांडगे इच्छुक...

सिपोरा अंभोरा जिल्हा परिषद गणातून भारतीय जनता पार्टीकडून सौ.रमा मधुकर दांडगे इच्छुक उमेदवार

सिपोरा अंभोरा जिल्हा परिषद गणातून भारतीय जनता पार्टीकडून सौ.रमा मधुकर दांडगे इच्छुक उमेदवार

जाफराबाद/प्रतिनिधी/ जाफराबाद तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये सिपोरा अंभोरा जिल्हा परिषद सर्कल मध्ये इच्छुक असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सौ रमा मधुकर दांडगे यांचे पती मधुकर दांडगे यांनी जिल्हा परिषद सर्कल मधील सिपोरा अंभोरा, ब्रह्मपुरी, देऊळझरी, मंगरूळ, रूपखेडा बु., रुपखेडा खु., डोलखेडा बु., हनुमंतखेडा, बोरखेडी चिंच, आळंद, हिवराकाबली, सावरगाव म्हस्के, खामखेडा, गोंधनखेडा, कुंभारझरी, सावंगी, डावरगाव देवी, टाकळी, गारखेडा, निमखेडा बुद्रुक, नळविहिरा अशा २१ गावांचा दौरा करून मतदारांच्या भेटी गाठी घेत जन आशीर्वाद घेतला आहे.
मधुकर दांडगे हे याच जिल्हा परिषद सर्कल मधील हिवराकाबली येथील रहिवाशी असून त्यांचा या जिल्हा परिषद सर्कलमध्ये दांडगा जनसंपर्क असून नातलग मंडळी आहे.
आणि याच जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागितलेली आहे.
त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पूर्ण तयारी करून या सर्कलमध्ये जनतेच्या ते संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन काम करीत आहे.मधुकर दांडगे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ असल्याकारणाने त्यांना या सर्कलमधील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी मधुकर दांडगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दैनिक लोकनायकशी बोलताना सांगितले की माझ्या शिपोरा अंभोरा या जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी गोरगरीब दिन दलित वंचित व सर्वच घटकासाठी मी काम केलेले आहे माझे या सर्कल मधील सर्व समाजातील लोकांशी नागरिकांशी जीवाळ्याची आपुलकीचे संबंध आहे त्यामुळेच या सर्कल मधील जनतेचा मला भरभक्कम पाठिंबा असल्याने मला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे व भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास या जिल्हा परिषद सर्कल मध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवल्या शिवाय राहनार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments