सिंदफणा नदीच्या महापुराने कुक्कडगाव आणि परिसरातील शेतीचे आणि पिकाचे प्रचंड नुकसान
बीड/प्रतिनिधी/ बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीच्या महापुराने कुक्कडगाव आणि परिसरातील शेतीचे आणि पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
तरी मायबाप सरकारने पंचनामे आणि सोपस्काराला बगल देऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी या भागातील शेतकरी बांधवांनी केली आहे. तरी मायबाप सरकारने सर्व गोष्टी बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये तातडीने मदत जमा करावी हिच आमची मागणी आहे असे या पंचक्रोशीतील हजारो शेतकरी बांधवांनी केली आहे.