श्रीराम वाचनालयात जागतिक योग दिवस साजरा
जालना येथील ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय व धरतीधन आयोजित (दि.२१) रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उसाहत साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या राज्य सचिव शिल्पा शेलगावकर,योग शिक्षक अंकूश गाढे,ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष कैलास बियाणी, जनकल्याण रक्त पेढीचे माजी सचिव पुसाराम मुंदडा,धरतीधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद सावंत,श्रीराम वाचनालयाचे सचिव श्रीकांत शेलगावकर यांची उपस्थिती होती. आद्य संघ संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाम शेलगावकर योगा विषयीचे घोषवाक्य म्हणून घेतले.
शिल्पा शेलगांवकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि, नियमित योग केल्यानंतर शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहतो. शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणेज मन. मनाकडे लक्ष देणारा कोणताही व्यायाम प्रकार अस्तित्वात नाही. हिंदू संस्कृतीमध्ये योग असा प्रकार आहे ज्यामध्ये मनाचा अभ्यास केले जातो. मनाचा व्यायाम हा फक्त योग अभ्यासात होतो म्हणून योगाला आज सर्व जगात महत्व आलेल आहे. योग अभ्यासाने निर्मिण होणारी उर्जा ही अतिशय सकारात्म उर्जा असते. जीवआत्मा व परमात्म्याचे मिलन म्हणजे योग.
योग दिनानिमित्त योग शिक्षक अंकुश गाढे यांनी कपालभाती,अनुलोम-विलोम, सूक्ष्मयोग,सूक्ष्मक्रिया,ताडासन,वज्रासन,शशांकआसन,पवनमुक्ता आसन,वीराआसन,प्राणायाम,तालीयोग,ओंकार ध्वनी या आसनांची माहिती दिली देत त्याची प्रात्यक्षिके उपस्थिताकडून करून घेतली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी तर उपस्थिताचे आभार शैलेंद्र बदनापुरकर यांनी केले. कुणाल सेवलीकर,गुलाबराव जैन,राम महाजन,नितिन बावणे, अॅड. श्रावण पवार, डॉ.डी.डी.पाटील, वैभव गरदास, उर्मिला सोळंके, नंदा शेलगांवकर, मंगला वानखेडे, शकुंतला शेलगांवकर, प्रतिक्षा काळे,अक्षरा कत्ते, रेणुका शेलगांवकर,रेणुका गुलापेल्ली,अश्विनी भाले यासह अंगणवाडीतील विद्याथी,पालक,शिक्षक व वाचकवर्ग उपस्थित होता.
