श्री संत भगवान बाबा सार्वजनिक गणेश
दैनिक आताच एक्स्प्रेस
परतुर/प्रतिनिधी/ परतुर तालुक्यातील मोजे रायगव्हाण येथे एक गाव एक गणपती सामाजिक व धार्मिक पद्धतीने उपक्रमातून एक गाव एक गणपती गेल्या बऱ्याच वर्षापासून गणपती उत्सव मोठ्या संख्येने साजरा होतो रायगव्हाण येथील श्री संत भगवान बाबा सार्वजनिक गणेश मंडळ व वारकरी संप्रदायक भजनी मंडळ यांनी तर एका अनोख्या पद्धतीने अनेक सकाळी काकडा भजन हारीपाट झाले नंतर ग्रंथ कथा लावल्या आहेत कथेला संपूर्ण गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे कथेच्या आरती झाल्यानंतर चिट्टी पद्धतीने ज्या कोणत्या गणेश भक्ताचे नाव चिठ्ठी मध्ये येईल अशा गणेश भक्तांना रोज गणपती बाप्पाच्या आरतीचा मान दिला जातो असे रोज पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाचे आरत्या केल्या जातात रायगव्हाण गावातील गणेश मंडळ चे अध्यक्ष रत्नदीप पोटे व उपाध्यक्ष अमोल पोटे तर सचिव अभिषेक पोटे श्रीराम कडपे रोहित केकान तसेच सिद्धू मुंडे रायगव्हाण गावातील सरपंच नागरिक यांनी गाव पातळीवर बैठक घेऊन आर्केस्ट्रा या कार्यक्रमाचे नियोजन करून आर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर. शुक्रवार दिनांक 5 /9 /2025 रोजी सकाळी 8 ते 9 दिंडी प्रदक्षिणा होईल व त्यानंतर सकाळी अकरा ते एक वाजता श्री ह. भ. प. भागवताचार्य श्रीराम महाराज चोले यांचे हरिकीर्तन होईल दुपारी एक ते आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाला सुरुवात होईल महाप्रसादानंतर रात्री नऊ वाजता भजनी मंडळ यांच्या गवळणी चा संगीतमय कार्यक्रम व भारुड रंगीत संगीत यांचे जंगी सामना कार्यक्रम होईल आशा पारंपारिक पद्धतीने सर्व कार्यक्रम टाळ मृदंगाच्या गजरात किर्तन भारुड गवळणी असे पारंपारिक संस्कृत कार्यक्रम दैनंदिन पार पाडले.
