श्री मंगलनाथ मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष मा. आर. जी. कानडे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
मा.श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
माजलगाव/प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन व नॅशनल फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट च्या संयुक्त विद्यमाने आशिया अखंडातील सर्वात मोठी असलेलेली बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीचे मार्गदर्शक,आधारस्तंभ, मा.राधेशामजी चांडक हे ७५ व्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल अमृत महोत्सव सोहळा कार्यक्रम सहकार मंदिर बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला होता…
सदरील अमृत सोहळा कार्यक्रमांमध्ये माजलगावचे भूषण,सहकार रत्न, श्री मंगलनाथ मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष श्री.आर.जी कानडे साहेब यांना मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त प्रथमच महाराष्ट्रातील सहकार चळवळ सक्षमीकरण करण्याकरिता आपले अमूल्य व महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार वितरीत करण्याचा ठराव घेण्यात आला…
त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व पतसंस्था व मल्टीस्टेट यांच्याशी समन्वय व विचारविनिमय करून प्रथम पुरस्काराचे मानकरी म्हणून श्री आर जी कानडे यांना नामांकित करण्यात आले…
सदरील कार्यक्रमाचे उद्घाटक मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य.तर प्रमुख उपस्थिती मध्ये मा.नामदार श्री प्रतापराव जाधव,राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य, श्री संजय गायकवाड विद्यमान आमदार बुलढाणा, श्री संजय कुटे,विधानसभा आमदार, श्री सिद्धार्थ खरात, विधानसभा आमदार श्री वसंत जी खंडेलवाल आमदार बुलढाणा हे होते…
श्री. आर.जी कानडे यांनी सहकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करताना संस्थात्मक विकास, पारदर्शक व्यवहार व सदस्यहित यांचा उत्तम समन्वय साधला आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे केवळ माजलगाव तालुका नव्हे तर मराठवाड्यातील सहकार चळवळ सक्षम होण्यास बहुमूल्य महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामुळे निश्चितच माजलगाव चे नाव लौकिक त्यांनी वाढवले आहे.