प्रति माननीय संपादकजी,
विषय:-श्रीगणेश विघ्नहर्ता व बुद्धीमत्तेचे अथांग महासागर
संपूर्ण सृष्टीचे पालनहार देवाधिदेव महादेव भोले शंकर,तर त्यांचे पुत्र गणपती बाप्पा विघ्नहर्ता व ज्ञानदाता सागर आहेत. त्यामुळेच श्रीगणेशांना सर्वच बाबतीत प्रथम स्थान देण्यात आले आहे. गणपती बाप्पा हिंदू धर्मातील आराध्य दैवत मानल्या जाते. कोणतीही पुजा-अर्चना असो सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा केली जाते.नंतरच इतर देवतांची पूजा केली जाते.कारण श्रीगणेश म्हणजे बुद्धीचा सागर,शांतीचे प्रतीक व बालगोपालांचे आवडते दैवत.देशात कोणत्याही देवी-देवतांची पुजा असो,परंतु आरतीची सुरूवात गणपतीच्या आरती पासून होत असते.याचाच अर्थ पृथ्वीतलावर गणेश वंदनेला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येते.रावणासारख्या महाकाय शक्तीला रोखण्याचे काम सुध्दा श्रीगणेशांनी केले.श्रीगणेशांना अनेक नावांनी संबोधले जाते गौरी पुत्र,अष्टविनायक अशा अनेक नावांनी श्रीगणेशांची पुजाअर्चना केली जाते.गणेशजी देवता आदिदेव असल्याने त्यांचे प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार पहायला मिळतात.गणेशजीला चार हात असतात हे चारही हात म्हणजे वेगवेगळ्या दिशांमध्ये व्यापकतेचे प्रतिक मानल्या जाते.देवी पार्वती आंघोळीला गेली असता गणपतीला पार्वतीने सांगितले की माझी आंघोळ होत नाही तोपर्यंत घरात कुणालाही प्रवेश द्यायचा नाही.गणपतीने आई पार्वतीला वचन दिले की ठीक आहे.कोणालाही घरात प्रवेश करू देणार नाही. परंतु तेवढ्यात भगवान शंकरजी दारात आले आणि म्हणाले की बेटा हे माझे घर आहे मला घरात जाऊदे.गणेशजीने भगवान शंकरजीना प्रवेश नाकारला व क्रोधित होवून गणपतीचे डोके त्याच्या धडापासून वेगळे केले.हे पाहुण आई विचलित झाली व काही क्षणातच शंकरजीला आपली चूक लक्षात आली आणि आपल्या दैवी शक्तीच्या आधारावर गणपतीच्या धड्यावर गजाचे मस्त ठेवले आणि गणपतीला जिवदान मिळाले.भगवान शंकरजीनी आपली चुक कबुल करत संपूर्ण ब्रम्हांडात गर्जना केली की पुजेचा पहिला मान गणपतीला दिला जाईल असे गणपतीला वर्दान दिले.म्हणुनच गणपतीची प्रथम पुजा केली जाते.श्रीगणेशजी विवाहित होते त्यांना दोन बायका होत्या एकीचं नाव रिद्धी आणि दुसरीचे नाव सिद्धी होते.यांना दोन मुलं होती शुभ आणि लाभ त्यामुळे प्रथम पुजा गणेशची होते व सोबतच शुभ-लाभ दिसून येते.यात आपल्याला सर्वत्र शुभ संकेत दिसून येतात.आपल्याला अनेक पुराणांमध्ये गणपतीचे अनेक नावे पहायला मिळतात यात एकदंत, विनायक, लंबोदर,भालचंद्र,गजानन इत्यादी विभिन्न नावांनी आपण श्रीगणेशाची आराधना करीत असतो. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्रानुसार श्रीगणेशांना केतू म्हणून ओळखले जाते केतू हा शांत ग्रह असल्याने संपूर्ण सृष्टीत सावलीची भुमिका पार पाडते व राहु ग्रहांच्या विरोधात सदैव ठाम भूमिका बजावीत असते.त्यामुळेच म्हणतात विरोधाशिवाय ज्ञान नसते आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नसते. त्यामुळे गणपती देवता हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे म्हणूनच श्रीगणेशाला आपण विघ्नहर्ता म्हणतो.भारत अनेक धर्मांनी, जाती-पंथाने विनलेला देश आहे.त्यामुळे प्रत्येक धर्म आपापल्या पद्धतीने आपापल्या संस्कृती प्रमाणे सण साजरे करतांना दिसतात.भारतात प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या देवी-देवतांची महत्त्व आहे त्यापध्दतीने पुजा-अर्चना केली जाते.प्रत्येक गणेश चतुर्थीला गणेशाची आराधना करून भक्तगण आपली मनोकामना पूर्ण करण्याचा सर्वच प्रयत्न करतात.परंतु भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेशोत्सव.गणेशमुर्तीची स्थापना करून गणेशोत्सव तब्बल १० दिवस चालतो.या कालावधीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आपल्याला रोषणाईची झगमगाट दिसून येते.यापध्दतीने गणेशोत्सवाचा आनंद संपूर्ण लोक मोठ्या उत्साहाने व गुना गोविंदाने साजरा करतात.लोक गणेशोत्सवात इतके तल्लीन होऊन जातात की १० दिवस कसे गेले हे कोणालाच कळत नाही.गणपती बाप्पा पुन्हा लवकर यावा यासाठी “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”घोषणांचा गजर करत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.इंग्रजांना शह देण्यासाठीच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरूवात केली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनजागृती करून इंग्रजां विरूद्ध मोठा लढा उभारला व आक्रमक पवित्रा निर्माण केला.त्यामुळे गणेशोत्सव हा सण स्वतंत्र लढ्यासाठी सूध्दा कारगर सिध्द झाला.लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची लावलेली परंपरा आजही संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात दिसुन येते. त्यामुळेच महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.पुराणानुसार परशुराम एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करून कैलासी आले असता दरबार रक्षक गणेशाने त्यास अडवले व दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले.यात परशुरामाच्या परशुमुळे गणेशाचा एक दात तुटला त्यामुळे श्रीगणेशांना एकदंत सूध्दा म्हणतात असे पुराणामध्ये नमुद आहे.गणेशाला पुजेचे स्थान प्रथम असल्याने आपण पाहतो प्रत्येक मंदिरात आपल्याला गणेशाची मूर्ती दिसुन येते ते मग कोणतेही मंदिर असो. गणेशाचे मुख्य वाहन मुशकराज (उंदीर) त्यामुळे श्रीगणेशा सोबतच उंदराची सूध्दा पुजा-अर्चना केली जाते.पुजेमध्ये मुख्यत्वेकरून दुर्वा,बेल-फुल,शम्मीपत्र, शेंदूर यांचा वापर होतो.भारतात श्रीगणेशांची अनेक मोठ-मोठी मंदिरे आहेत.त्याचबरोबर नेपाळमध्ये आपल्याला गणेशाची असंख्य मंदिरे पहायला मिळतात.कारण श्रीगणेश हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये मुख्य दारावर गणपतीची फोटो आपल्याला दिसुन येते.मानवजातीला दे्वी-देवतांनी पृथ्वीची रक्षा करण्यासाठी पृथ्वीतलावर जन्म दिला.परंतु मानवजातीने या धरतीमातेचा दुरूपयोग केल्यामुळे पृथ्वीतलावरील निसर्गाचा दिवसेंदिवस ह्यास होत आहे.याला वाचविण्यासाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात १० दिवस वृक्ष लागवडीची मोहीम सरकार मार्फत,प्रशासना मार्फत, शाळा -महाविद्यालय, सामाजिक संस्थांमार्फत व संपूर्ण गणेश मंडळांच्या मार्फत वृक्षारोपण व्हायला पाहिजे.यामुळे संपूर्ण भारतात हिरवागार गालिचा निर्माण होईल व येणारे महाप्रलय रोखण्यास मोठी मदत होईल, पृथ्वीचे संतुलन राखण्यास मोठी मदत होईल व सर्वत्र हिरवागार गालिचा पसरलेला दिसुन येईल.यातही आपल्याला गणेशोत्सवाचा आनंद अवश्य दिसून येईल.गणपती बाप्पा मोरया!
–रमेश कृष्णराव लांजेवार
