श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण कथा सोहळ्याचे आयोजन
भाविक भक्तांनी लाभ घ्यावा
माजलगाव /प्रतिनिधी/ शेख हमीद /शहरातील नवनाथ नगर येथे सोळा वर्षापासून श्रीराम नवमी सोहळा साजरा केला जातो निमित्त याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ह.भ. प. परमेश्वर महाराज फपाळ यांच्या वाणीतून दिनांक ०६ एप्रिल ते १२ एप्रिल २०२५ पर्यंत शिवपुराण कथा होणार असून या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त नवनाथ नगर महिला मंडळ माजलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रति वर्षाप्रमाणे गेल्या सोळा वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा संगीत कथा प्रवक्ते ह.भ.प. परमेश्वर महाराज फपाळ यांच्या सुश्राव्यवाणीतून कथा होणार आहे तसेच संगीत साथ शिथवादक व गायक एकनाथ महाराज कोंडवणे, तबला विशादक संदीप महाराज नरके यांची साथ लाभणार आहे व विष्णू सहस्त्रनाम नेतृत्व श्रीरामजी मुंदडा, ज्ञानेश्वरी नेतृत्व सौ. मीराताई डहाळे, शिवहर गायगवे यांचे असणार आहे या सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे सकाळी ०७ ते ०८ विष्णू सहस्त्रनाम,०८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ०७ ते ०४ नामास कीर्तन भजन, मंगळवारी सुंदर कांड, ०५ ते ०६ सामूहिक हरिपाठ महिला मंडळ नवनाथ नगर व तसेच रात्री ०७ ते १० शिवपुराण कथा होईल तसेच या कथेची सांगता १२ एप्रिल रोजी .ह.भ. प.परमेश्वर महाराज फपाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल व महाप्रसाद नरेंद्र प्रभाकर डुकरे यांच्या वतीने होईल तरी सर्व कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन नवनाथ नगर महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.