Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादश्रद्धा पांडु लबडे ची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघात निवड

श्रद्धा पांडु लबडे ची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघात निवड

श्रद्धा पांडु लबडे ची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघात निवड
पिपंळवाडी/प्रतिनिधि/ पैठण तालुक्यातील मुधलवाडी गावातील श्रद्धा पांडुरंग लबडे हिने दिनांक 5 ते 7 डिसेंबर रोजी गौतम पब्लिक स्कूल कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत भाग घेतला होता ती प्रवरा कन्या विद्या मंदिर या शाळेकडून मुलींचा 14 वर्षे वयोगटात तिचा संघ खेळत होता. या संघाने राज्यात द्वितीय क्रमांकाने विजय मिळून विद्यालयाचे नाव लौकिक केले. कोळपेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिर शाळेतील हॉकी टीमची कर्णधार श्रद्धा लबडे, जानवी वाघमोडे, संस्कृती शेटे, खुशी तुपे, तेजल वाकडे, अमृता गोरे, किरण लवांडे, सई देशमुख, विशाखा महाजन, भक्ती बावणे, दिव्या पांढरे ,दीप्ती आमटे, प्राची पारखे ,वैष्णवी काळे ,शिवानी काळुसे, मानसी देवरे ,शिवानी येडे ,अंकिता होळकर, या सर्वांचा सहभाग होता. विद्यालयातील यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे सचिव सौ. चैताली ताई ,आशुतोष दादा काळे ,यांनी ट्रॉफी देऊन खेळाडूंची कौतुक केले. मध्यप्रदेश ग्वालियर येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघात सध्या संघाचे कर्णधार पद निभावणाऱ्या श्रद्धा लबडे, जानवी वाघमोडे, संस्कृती शेटे , यांची निवड झाली आहे. पैठण तालुक्यातील मुधलवाडी येथील असलेली श्रद्धा लबडे हिने गावाचे नाव लौकिक केल्यामुळे सर्व स्तरात तिचे स्वागताचा वर्षाव होताना दिसत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments